पनवेल : भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या करणी सेनेच्या महाराष्ट्र अध्यक्षाला भीमसैनिकांनी आज चांगलाच चोप दिला. ही घटना पनवेलमधून समोर आली आहे.
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरणे करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह तोमर यांना चांगलेच महागात पडले आहे.
भिमसैनिकांनी पनवेलच्या अग्निशमन कार्यालयाजवळ तोमर यांना गाठत मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तोमर याने पुन्हा चुक केल्यास पुन्हा धुवून काढू असा इशारा भीमसैनिक सागर पगारे आणि सुभाष गायकवाड यांनी दिला आहे.
अजय सिंग सेंगर यांनी दोनवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. आपल्याला संविधानाची गरज नाही. संविधान बदला, असं ते लोकांना सांगतात. आम्ही सर्वांनी या विरोधात पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. पण त्यांनी दोन वेळा जामीन घेतल्यामुळे ते बाहेर आले, अशी प्रतिक्रिया सुभाष गायकवाड यांनी दिली.
देशाचे संविधान बदलण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष सेंगर यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. सेंगर हे काही कामानिमित्त पालिका कार्यालयात आले होते. त्याचवेळी भीमसैनिकांनी सेंगर यांना मारहाण केली.
सेंगर हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी या पूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. एका वादग्रस्त वक्तव्यावरून सेंगर यांना अटक देखील करण्यात आली होती