कर्जत-जामखेडच्या शेतकरी कृषी दिंडीने घेतले कांदा पिकाच्या तंत्रज्ञानाचे धडे (Karjat-Jamkhed farmer Krishi Dindi took onion crop technology lessons)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलावे यासाठी राजगुरूनगर येथील कांदा- लसुण संशोधन केंद्रावर कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांची कांदा दिंडी काढण्यात आली होती.

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कांदा लसुण  संशोधन केंद्राचा दौरा केल्यानंतर या दिंडीने बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह कांदा उत्पादकांच्या प्रक्षेत्रावर जाऊन पाहणी केली.राजगुरुनगर येथील कांदा लसुण संशोधन केंद्राचे डॉ. काळे यांनी कांदा पिकाचे नवीन वाण, हंगामानुसार वाण, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन,रोग व किड नियंत्रण, निर्यात योग्य वाण व साठवणूक पद्धती या विषयी सखोल  मार्गदर्शन केले.