- Advertisement -

खासदार सदाशिव लोखंडेंनी लावली जिल्हा बँकेसाठी फिल्डींग:पुत्र चेतन निवडणुक मैदानात!(MP Sadashiv Lokhande fielding for District Bank: Son Chetan in the election field)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख): जिल्हा बँकेच्या निवडणूकीत खासदार सदाशिव लोखंडे सक्रीय झाले आहेत. खासदार लोखंडे यांचे पुत्र डाॅ चेतन लोखंडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनुसुचित जाती या मतदारसंघातून डाॅ चेतन लोखंडे हे निवडणुक लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.(MP Sadashiv Lokhande fielding for District Bank: Son Chetan in the election field)

नूकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डाॅ चेतन लोखंडे यांनी श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची जय्यत तयारी केली होती. परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. आता जिल्हा बँकेच्या राजकारणाच्या माध्यमांतून डाॅ चेतन लोखंडे हे सहकार चळवळीत सक्रीय होत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. डाॅ चेतन यांच्या रूपाने जिल्हा बँकेच्या राजकारणात दोन जामखेडकर संचालक दिसतील का ? याचीच आता उत्सकुता लागली आहे.