Ram Shinde News : विधिमंडळाच्या सर्वोच्चपदी ; पाय मात्र जमिनीवरच, विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या साधेपणाची राज्यात जोरदार चर्चा!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । Ram Shinde News : सत्तेच्या शिखरावर पोहोचले की अनेकांचा स्वभाव आणि वागणूक सहजपणे बदलते. मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात असे काही मोजके नेते असे आहेत, जे सत्ता, पद आणि प्रतिष्ठेपलीकडे जाऊन आजही आपला साधेपणा जपताना दिसतात. याच मोजक्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंचा (Vidhan Parishad Sabhapati Ram Shinde ) समावेश होतो. ९ ऑगस्ट २०२५ रोजी ते कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या दौर्‍यावर असताना, त्यांनी केलेली एक कृती राज्यात जोरदार चर्चेत आली आहे.विधीमंडळाच्या सर्वोच्चपदी असूनही आपले पाय जमिनीवरच आहेत, असाच थेट आणि स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

Ram Shinde News , At the highest position in legislature but with his feet on the ground, vidhan parishad sabhapati Ram Shinde's simplicity is hotly debated in maharashtra

नेमकं काय घडलं ?

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे आज ९ ऑगस्ट २०२५ रोजी कर्जत तालुक्यातील मिरजगाव दौर्‍यावर होते. मिरजगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. अतिशय भक्तिभावाने या सोहळ्यात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाविकांमध्ये बसून महाप्रसादाचा अस्वाद घेतला. (Ram Shinde latest News)

त्यानंतर जेवणाच्या पंगतीतून बाहेर जात असताना त्यांनी पदाचा रूबाब न दाखवता साधेपणाचा मार्ग निवडला आणि गर्दीतून वाट काढताना प्रा राम शिंदे यांनी स्वतःच्या हातात चप्पल घेतल्या आणि ते पंगतीमधून बाहेर पडले. त्यांच्या या साधेपणाच्या कृतीने उपस्थितांचे मन जिंकली.पदाच्या शिखरावर असूनही जमिनीशी जोडलेला राहणे हीच खरी मोठेपणाची खूण आहे हेच प्रा. राम शिंदेंच्या या कृतीने पुन्हा अधोरेखित केले.या कृतीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. (Ram Shinde News)

विशेष म्हणजे, कार्यक्रमातून शिंदे हे बाहेर जात असताना एक महिला राखी बांधण्यासाठी त्यांच्या जवळ आली. त्यावेळी त्यांनी लगेचच आपला दुसरा हात पुढे करत राखी बांधून घेतली.

सत्ता, पद आणि प्रतिष्ठेपलीकडे जाऊन लोकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या नेत्यांची संख्या कमी आहे. राजकारणात साधेपणा हा दुर्मिळ होत चाललेला गुण आहे. परंतू प्रा. राम शिंदे यांनी हा गुण केवळ जपला नाही, तर तो कृतीतून दाखवून दिला. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमात पदाचा कुठलाही बडेजाव न करता त्यांनी साधेपणा जपला. त्यांची ही कृती तरूण पिढीतील राजकारण्यांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे. (Ram Shinde News)

प्रा. राम शिंदे यांनी मिरजगावमधील प्रसंगातून माणुसकी, साधेपणा, आणि कायम जमिनीशी जोडुन राहणे याचाच वस्तुपाठ घालून दिला आहे. विधीमंडळाच्या सर्वोच्चपदी असतानाही प्रा. राम शिंदे यांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘लोकांचे नेते’ ठरतात, अशीच चर्चा कर्जत जामखेड मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

प्रा. राम शिंदे (ram shinde) यांचा राजकीय प्रवास साधेपणा आणि लोकसंपर्काच्या आणि संघर्षाच्या बळावर उभा आहे. सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार, मंत्री, विधानपरिषदेचे सभापती असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. गावोगावच्या दौर्‍यावर जाताना आजही ते सामान्य माणसांमध्ये, छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळून जातात. कायम जनतेत रमणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच बलस्थानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील त्यांचे वेगळेपण जनतेच्या मनात घर करणारे ठरत आहे. (Ram Shinde News)