- Advertisement -

दुहेरी हत्याकांड : लहान मुलासह मुंडके नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने उडाली मोठी खळबळ (Double murder: The discovery of the body of a woman without a head with a small child caused a great stir)

शेवगाव (जामखेड टाईम्स वृत्तसेवा)  शेवगाव शहरातील तहसील कार्यलयाजवळील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत ६० ते ६५ वर्षीय महिलेच्या मृतदेहासह  काही अंतरावर १० ते १५ वर्षीय मुलाचाही मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या घटनेतील महिलेच्या मृतदेहाला मुंडकेच नसल्याचे आढळल्याने शेवगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेमुळे  शेवगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दुहेरी हत्याकांड की अन्य काही हे पोलिस तपासात समोर येईलच परंतु सध्या तरी दुहेरी हत्याकांडाची शक्यता वर्तवली जात आहे. (Double murder: The discovery of the body of a woman without a head with a small child caused a great stir)

सदरील घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून सदरील घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब गिरी, पोलिस कॉन्स्टेबल अच्युत चव्हान , पोलिस नाईक रवींद्र शेळके, बाप्पासाहेब धाकतोडे, अस्लमभाई शेख, सुधाकर दराडे, अमोल ढाळे, अनमोल चिमणे आदींनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनेची पाहणी करून दोन्ही मयताचे शव उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास चालू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिस वेगाने करत आहेत.