Jamkhed Panchayat Samiti | जामखेड पंचायत समितीने केले 55 विद्यार्थ्यांना सन्मानित 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :Jamkhed Panchayat Samiti | गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर ते अधिक ऊर्जेने भविष्यात यशाची नवे शिखरे पादाक्रांत करतील म्हणूनच स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे असे प्रतिपादन जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

जाहिरात

नुकताच इयत्ता पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात जामखेड तालुक्यातील 55 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचा जामखेड पंचायत समितीच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. (Jamkhed Panchayat Samiti honored 55 students)

यशस्वी विद्यार्थ्यांना पंचायत समितीकडून अभिनंदनपर प्रमाणपत्र देण्यात आले. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती राजश्रीताई सुर्यकांत मोरे होत्या. यावेळी पदाधिकारी व अधिकारी तसेच शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.