Corona Big News | दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोघांना कोरोनाची लागण : भारताच्या चिंता वाढल्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  Corona Big News | दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटने (Omicron Corona variant) जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अश्यातच भारताची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) कर्नाटकात (karnataka) आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कनार्टकातील बंगळूर विमानतळावर (Bangalore Airport) दक्षिण आफ्रिकेतून एक प्रवासी विमान आले होते. या विमानातील दोघा दक्षिण आफ्रिकी प्रवाश्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे कोरोना तपासणीतून निष्पन्न झाले आहे. मात्र त्यांना कोणत्या विषाणूची बाधा झाली आहे हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. सरकार सध्या दोघांच्या नमुन्यांची सखोल तपासणी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 2 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बंगळुरू विमानतळावर हे प्रवाशी उतरले होते. चाचणी केल्यांनतर या दोन्ही प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत बंगळुरूमध्ये 594 प्रवाशी परदेशातून दाखल झाले आहेत. यातील 94 प्रवाशी हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतील आहेत. (94 passengers are from South Africa alone) कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्णांना सध्या क्वॉरन्टाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.

जाहिरात

पंतप्रधानांनी घेतली महत्त्वाची बैठक, खबरदारी घेण्याची सूचना

या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोणती काळजी घ्यावी, काय खबरदारी घेण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवावे, असे सूचित करण्यात आले आहे.

नव्या व्हेरिएंटबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे?

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराला शास्त्रीय भाषेत B.1.1529 या नावाने ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word). WHO ने सांगितले की ज्या पहिल्या नमुन्यातून ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. ओमिक्रॉन या विषाणूनची लागण झालेले रुग्ण आता बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेत आढळत आहेत.

इंग्लंडमध्ये आढळले दोन रूग्ण (Two patients of Omicron Corona variant were found in England)

जगाची चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटचे (Omicron Corona variant) दोन रूग्ण इंग्लंडमध्ये आढळून आले आहेत. हे दोन्ही रूग्ण आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये परतले आहेत. सध्या दोघे विलिनीकरण कक्षात उपचार घेत आहेत अशी माहिती इंग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद (Health Minister of England Sajid Javid ) यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केली नवी नियमावली

जगाची झोप उडवून दिलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुन्हा मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेलं आहे अशाच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. असं असलं तरी राजकीय सभांना आणि जाहीर कार्यक्रमांना मात्र परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोनाचे नियम पाळले नाहीत, अशा लोकांकडून घेण्यात आलेला दंड देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मास्क घातला नसेल तर त्या व्यक्तीला 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये जर कोणी मास्क घातलेला नसेल तर प्रवाशाला 500 रूपये दंड आणि चालकाला देखील 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तर दुकानदारांना देखील मास्क घातला नसल्यावर 500 रूपये दंड घेण्यात येईल.

मुंबईतील एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी