Breaking News : पोलिस पथकावर काळाचा घाला, गाडीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी, मृतांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा समावेश!

जळगाव, दि, 30 जून 2023 : जळगाव जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी अपघाताची घटना समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळण्याची घटना घडली आहे.या दुर्दैवी घटनेत सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चालकाचा जाग्यावर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ( API Sudarshan Datir latest news)

Jalgaon Breaking News, two died and three were seriously injured after tree fell on police car, Assistant Police Inspector Sudarshan Datir was included in dead, Sudarshan Datir latest news,

जळगावहून एरंडोल कासोदा भागातील पिलखोड येथे एका आर्थिक गुन्ह्याच्या तपास कामासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जात होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाची गाडी अंजनी धरणाजवळच्या परिसरात आली असता, त्यांच्या गाडीवर अचानक एक मोठे झाड कोसळले. ही घटना गुरूवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. या घटनेत सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jalgaon Accident news today)

दरम्यान, या अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर, चालक अजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सुर्यवंशी, भरत जेठवे हे तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले.  घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. (Jalgaon Police Accident latest news)