मोठी बातमी : पुण्यात दोन पोलिस निरीक्षकांसह 10 जणांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस आयुक्त Ritesh Kumar IPS यांची धडाकेबाज कारवाई, पोलिस दलात उडाली मोठी खळबळ

पुणे, 29 जून 2023 : 10 Police Suspended in pune : पुणे पोलिस दलात मागील दोन दिवसांत 2 पोलिस निरीक्षकांसह 10 पोलिसांना निलंबित करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलात मोठी खळबळ उडाली आहे.आजवरची सर्वात मोठी कारवाई म्हणून याकडे पाहिलं जात आहे.पोलिस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar) ॲक्शन मोडवर आल्याने पोलिस दलातील अनेकांचे धाबे दणाणून गेले आहेत. (Police suspension Pune)

Big news, Hasty suspension of 10 people including 2 police inspectors, rash action of police commissioner Ritesh Kumar IPS, excitement in pune city police force

सहकार नगर भागात नुकतीच गाड्यांच्या तोडफोडीची घटना समोर आली होती. या घटनेतील गुन्ह्यांची गंभीरपणे दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन पोलिस निरीक्षकांसह सात जणांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक मनोज एकनाथ शेंडगे या दोन पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. (Senior Police Inspector Savalaram Salgaonkar, Police Inspector Manoj Eknath Shendge Suspended)

दोन पोलिस निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य कसूर ठेवल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, पोलिस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलाणी, पोलिस उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे, पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे, पोलिस हवालदार संदिप जयराम पोटकुले यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.आजच्या निलंबनाच्या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलिस निरीक्षक,  दोन पोलिस उपनिरीक्षक, 2 हवालदार  यांचा समावेश आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर प्राणघातक हल्ला होण्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पेरू गेट पोलिस चौकीतील तिघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, आता आणखी सात जणांचे निलंबन करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar IPS) यांनी गत दोन दिवसांत दहा पोलिसांचे निलंबन करत कारवाईचा दंडूगा चालवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. 

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निलंबित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे खालील प्रमाणे (Names of the officers and employees suspended by Pune Police Commissioner Ritesh Kumar are as follows)

1) Senior Police Inspector Savalaram Salgaonkar, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर,

2) Police Inspector Manoj Eknath Shendge, पोलिस निरीक्षक (गुन्हे) – मनोज एकनाथ शेंडगे,

3) Assistant Police Inspector Sameer Vitthal Shende, सहाय्यक पोलिस निरीक्षक- समीर विठ्ठल शेंडे,

4) Police Sub-Inspector Hasan Maqbool Mulani, पोलिस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलाणी,

5) Police Sub-Inspector Maruti Govind Waghmare, पोलिस उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे,

6) Police Constable Vinayak Dattatray Jambhale, पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे,

7) Police Constable Sandeep Jairam Potkule पोलिस हवालदार संदिप जयराम पोटकुले,