भारतातील पहिली खाजगी ट्रेन साईबाबांच्या भेटीला, कोईम्बतूर ते शिर्डी 800 जणांनी केला प्रवास !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : India’s first private train arrives in Shirdi । देशात खाजगी ट्रेन वाहतुकीस प्रारंभ झाला आहे. कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर देशातील पहिली खाजगी ट्रेन धावली. आज कोईम्बतूरहून देशातील पहिली खाजगी ट्रेन शिर्डीत दाखल झाली. साईबाबांच्या भेटीला आलेल्या या ट्रेनचे शिर्डीकरांनी जल्लोषात स्वागत केले. या ट्रेनमध्ये तब्बल आठशे जणांनी प्रवास केला. (India’s first private train runs on Coimbatore to Shirdi route, India’s first private train to visit Sai Baba, 800 people traveled from Coimbatore to Shirdi)

भारत गौरव मोहिमेअंतर्गत देशातील पहिल्या खाजगी रेल्वे सेवेला मंगळवारी कोईम्बतूर येथून प्रारंभ करण्यात आला. आज ही ट्रेन शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनवर पोहचली. केंद्र सरकारने एका खाजगी सर्व्हिस प्रोव्हायडरला ही ट्रेन 2 वर्षाच्या लीजवर दिली आहे. या योजनेला मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यास यापुढे अश्या प्रकारच्या अनेक ट्रेन देशात धावू शकतात. (India’s first private train arrives in Shirdi)

दरम्यान कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर ही ट्रेन महिन्यातून तीनदा धावणार आहे. यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तिकीटाचे दर सामान्य ट्रेनमध्ये आकारले जाते तितकेच भाडे आकारले जाणार आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी शिर्डी साईबाबा मंदिरात VIP दर्शन व्यवस्थेची सुविधा दिली जाणार आहे. या ट्रेनसाठी 20 डब्बे असणार आहे.

कोईम्बतूर ते शिर्डी खाजगी रेल्वे प्रवास भाडे

1) नाॅन एसी – 2500 रुपये
2) थर्ड एसी – 5 हजार रुपये
3) फस्ट एसी – 10 हजार रुपये