RTE Admission । 25 टक्के आरटीई प्रवेश प्रक्रियेसंबंधी महत्वाची बातमी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Important news regarding 25 percent RTE admission process | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (right to education act) कायद्यान्वये खाजगी संस्थांद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रिये संबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख बदलण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी आरटीई अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरले जाणार होते परंतू यात आता बदल करण्यात आला आहे अशी माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

आरटीई कायद्यानुसार समाजातील वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये 25 टक्के जागा देणे बंधनकारक आहे. त्याच अनुषंगाने शासनाकडून RTE वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागवले जातात. आरटीई पोर्टलवर 1 फेब्रुवारी पासून सुरू होणारे 25 टक्के कोट्याचे प्रवेश आता 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत याची पालकांनी नोंद घ्यावी असे अवाहन गायकवाड यांनी केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परिक्षा ठरलेल्या तारखांनाच होणार  – वर्षा गायकवाड

दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मागील दोन दिवसांपासून राज्याचं वातावरण तापले आहे. हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीमुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी राज्यात ठिकठिकाणी अंदोलन केले. ऑनलाईन परिक्षा घ्याव्यात तसेच परिक्षा एक महिना पुढे ढकलावा अश्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. यामुळे परिक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतू परिक्षा ठरलेल्या तारखांनाच होणार असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.