OBC Political Reservation Big News | राज्यपालांनी केली सुधारित अध्यादेशावर सही, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

मुंबई  : वृत्तसंस्था | OBC Political Reservation Big News | राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा भलताच तापला होता. राज्यसरकारने या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालांकडे हा अध्यादेश पाठवला होता पण त्यात त्रुटी असल्याने तो परत पाठवण्यात आला होता. सरकारने त्रुटी दुर करत पाठवलेल्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी सही केली. यामुळे आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारने याबाबत पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्याने याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्यात सुधारणा करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला. यावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली.

राज्यपालांनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानले.

‘राज्यपालांनी अध्यादेशातील काही त्रुटी आम्हाला सांगितल्या होत्या. त्यात आम्ही सुधारणा करुन तो परत त्यांना पाठवला. आता या सुधारित अध्यादेशाला राज्यपालांनी मंजूर केलं, यासाठी आम्ही राज्यपालांचे आभारी आहोत’, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

 

web tital : OBC Political Reservation Big News | Governor’s signature on OBC Political Reservation Ordinance