Swarajya Dhwaj song launch : मातीत रूजला…गगनात सजला..नभी पसरला हा रंग.. भगवा..भगवा…भगवा…

स्वराज्य ध्वज गीताने घातली तरूणाईला भूरळ : स्वराज्य ध्वज यात्रेची देशभर चर्चा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Swarajya Dhwaj song launch | आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून खर्ड्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला (Kharda Bhuikot fort) परिसरात साकारलेल्या जात असलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाची यात्रा (Swarajya Dhwaj Yatra) देशातल्या वेगवेगळ्या भागात फिरत आहे.

शिवरायांच्या स्वराज्य धर्माच्या शिकवणीची आणि महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची सर्वांना आठवण करून देणाऱ्या स्वराज्य ध्वज यात्रेचे लहान थोरांपासून सर्वांनाच भारून टाकलं आहे. सध्या देशात भगवी स्वराज्य ध्वज यात्रा चर्चेत आली आहे.

Swarajya Dhwaj song launch

स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांधून तसेच देशातील सहा राज्यांतून फिरते आहे. या प्रेरणादायी मंगल ध्वजाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते आहे. स्वराज्य ध्वजाने अशा प्रकारे सर्वांनाच प्रोत्साहित केलेलं असतानाच आता ध्वजाच्या सोबतीला एक अत्यंत जोषपूर्ण स्वराज्य ध्वज गीत (Swarajya Dhwaj Song) देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे.या  गीताची संकल्पना देखील रोहित पवार यांचीच आहे.

सर्व सामाजिक प्रसारमाध्यमांवर हे गीत प्रसिद्ध करण्यात आलं असून अगदी काही तासातच या स्वराज्य ध्वज गीताने राज्यातील तमाम युवावर्गाला भुरळ घातलीय.(Swarajya Dhwaj song launch)

“मातीत रूजला…गगनात सजला..नभी पसरला हा रंग..” अशा दमदार शब्दरचनेला स्वर दिला आहे अवधूत गांधी यांनी; तर  संगीत दिग्दर्शन श्रेयस नंदा देशपांडे यांनी केले आहे. पुण्याच्या पुणे स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या गाण्याची कोरिओग्राफी अभिषेक हवारगी आणि विक्की माने यांची आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन आदित्य जी. राठी यांनी केले आहे तर संकलन गायत्री पाटील यांनी केले आहे.

Swarajya Dhwaj song launch

स्वाभिमानाचं, एकतेचं आणि महाराष्ट्राच्या परंपरेचं प्रतिक असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राची नवी निश्चयी करारी ओळख देशासमोर आणण्याचा संकल्प केला आहे. हे नवे वीररसपूर्ण स्वराज्य ध्वजगीत महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास देशापुढे नेण्यासाठी निश्चितच मोठं योगदान देईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे.त्या निमित्ताने या स्वराज्य ध्वजगीताची निर्मिती करण्यात आली आहे. (Swarajya Dhwaj song launch)

गेले पंधरा  दिवस कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे. स्वराज्य ध्वजाने आतापर्यंत बावीस जिल्ह्यांना भेट दिली आहे. या सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला  नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या स्फूर्तीदायी प्रवासाला आता या संकल्पगीताचीही साथ मिळणार आहे.आतापर्यंत हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी  जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील दोन राज्यांमध्ये देखील हि ध्वज यात्रा पोहोचली आहे.

सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वज संकल्पनेला ध्वज मोहिम यात्रेचं मूर्त स्वरूप दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय.

महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच  मथुरा-वृंदावन, केदारनाथ (उत्तराखंड),आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा (राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे.

या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती संकेतस्थळावर पाहाता येईल. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करा.

 

 

Web title: Swarajya Dhwaj song launch mla Rohit pawar