Ram Shinde News | माजी मंत्री राम शिंदे अचानक गाडीतून उतरून वाढदिवसाच्या पार्टीत धडकतात तेव्हा….

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Ram Shinde News | हैप्पी बर्थडे टू यु अमीन” असा वाढदिवसाचा जयघोष मित्रमंडळी करीत असताना अचानक गांधी चौकात एक गाडी थांबते. त्यातून एक पांढरा शुभ्र ड्रेस परिधान असणारी व्यक्ती खाली उतरते. आणि चक्क वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांच्या जमावात सामील होत त्या बर्थडे बॉयला केक सुद्धा भरवते. त्या युवकास देखील या अनपेक्षित पाहुण्याच्या शुभेच्छा आणि त्याच्या हस्ते केक खाण्याचा द्विगुणित आनंद लाभला. ती व्यक्ती म्हणजे माजी मंत्री प्रा राम शिंदे हे होय.

बुधवार, दि २२ रोजी माजीमंत्री प्रा राम शिंदे कर्जत दौऱ्यावर होते. संध्याकाळी शिंदे यांनी अनेक व्यापारी आणि पदाधिकारी यांची भेट घेत चहापान घेतला. रात्री ९ वाजता कर्जतहुन कोरेगावमार्गे चोंडीला जात असताना गांधी चौक या ठिकाणी अमीन झारेकरी या युवकांचा वाढदिवस मित्रमंडळी साजरा करीत होती. एक दुचाकी उभी करून त्यावर केक ठेवण्यात आला होता. युवकांचा “हॅपी बर्थडे टू यु अमीन” असा वाढदिवसाचा जयघोष सुरू होता.

ram shinde news karjat birthday party

रस्त्याने जात असताना अचानक राम शिंदे यांचे लक्ष वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांकडे गेले. त्यांनी तात्काळ आपले वाहन उभे करत त्या वाढदिवसात सामील झाले. चक्क जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यासह फडणवीस सरकारात तब्बल सात खाते भूषविणारे माजीमंत्री राम शिंदे यांनी युवकांच्या आनंदात हजेरी दिली. शिंदेच्या अचानक एन्ट्रीने युवक देखील आवक झाले.

ram shinde news karjat birthday party

यावेळी केकचा एक तुकडा हाती घेत वाढदिवस असणाऱ्या अमीनला शुभेच्छा देत केक भरवला. अनेक युवकांनी राम शिंदे यांच्याशी सवांद साधत सेल्फी घेण्याचा आनंद घेतला. यावेळी सरपंच काकासाहेब धांडे, गणेश क्षिरसागर, अनिल गदादे, वैभव शहा, राहुल गांगर्डे, विनोद दळवी, अनिल थोरात, गणेश पालवे, प्रवीण फलके, अफसर पठाण,आफताब सय्यद, मुदस्सर खान, जावेद झारेकरी, नाझीम झारेकरी, मजहर शेख, मेहराज पठाण, फैसल सय्यद, आतिश कुरैशी, रिजवान पठाण, सुफियान झारेकरी, मुबिन बागवान, फैज सय्यद, शकिल पठाण आदी उपस्थित होते.

 

डॉ अफरोज पठाण , कर्जत प्रतिनिधी