मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार मोठ्या घोषणा, राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेेतला मोठा निर्णय, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाची घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी चार मोठ्या घोषणा केल्या.

Four big announcements by Chief Minister Eknath Shinde, big decision taken for state employees, announcement of free ST travel for seniors who completed 75 years

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरुन 34 टक्के होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून  करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले

गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे  प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.