Talathi Bharati Link : तलाठी भरतीबाबत सर्वात मोठी बातमी, तलाठी भरती 2023 ची लिंक झाली खुली, इथे करा क्लिक अन भरा पटापट अर्ज !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महसुल विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या तलाठी भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 4644 तलाठी (गट क) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आज 26 जून रोजी खुली करण्यात आली आहे. सरकार नोकरी मिळवण्याचे धडपडणाऱ्या होतकरू उमेदवारांचे तलाठी होण्याचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार आहे.

Talathi Bharati 2023 Link, Good News for Govt Job Aspirants, Talathi Recruitment Link Opened, Fill Application Quickly, talathi bharati link latest update today,

तलाठी भरती 2023 ची भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडे आहे. या कार्यालयाच्या माध्यमांतून  राज्यातील 36 जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रकिया आज 26 जून पासून सुरु झाली आहे. तलाठी भरतीसाठीची ऑनलाईन लिंक https://mahabhumi.gov.in इथे खुली करण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 मध्ये एकुण 4644 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी येत्या 26 जून 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2023 रोजी 23: 55 वाजेपर्यंत आहे, अशी जाहिरातीत नमुद आहे.

महसुल विभागात 4 हजार 644 तलाठी पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तलाठी पदभरती राबविण्यासाठी महसूल व वन विभागाने राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे.(State Upper Jamabandi Commissioner and Additional Director Land Records Anand Raite)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु केला आहे.

सदर तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्‍या उमेदवारांसाठी सूचना   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख आनंद रायते (Anand Raite) यांनी कळविले आहे.

पदाचे नाव – तलाठी (गट क)
एकुण जागा – 4644
वेतनश्रेणी  – S-8 : 25500 – 81100 ( अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

तलाठी भरती लिंक : https://mahabhumi.gov.in