पालकमंत्र्यांच्या “या” निर्णयामुळे जामखेड पोलिस झाले गतीमान ! ( Due to the decision of the Guardian Minister, Jamkhed police became fast)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पोलिस दलाकडे जर चांगली वाहने असतील तरच गुन्हेगारांचा माग काढण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेसंबंधीच्या उपाययोजना गतिमान करता येऊ शकतात परंतु नादुरूस्त वाहनांमुळे येणार्या अडचणी लक्षात घेता. पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Guardian Minister Hasan Mushrif) यांनी जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला जिल्हा नियोजनमधून नवीन वाहने देण्याचा राज्यातील पहिला प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयामुळे जिल्हा पोलिस दलात चारचाकी नवीन वाहने दाखल झाले आहेत. (Due to the decision of the Guardian Minister, Jamkhed police became fast)

बुधवारी सायंकाळी जामखेड पोलिस स्टेशनला जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी जिल्हा नियोजनच्या निधीत मिळालेली एक नवी बोलेरो गाडी दिली. यामुळे आता जामखेड पोलिसांचा ( Jamkhed Police Station) कारभार गतिमान होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बुधवारी सायंकाळी नवी बोलेरो गाडी पोलिस स्टेशनच्या ताफ्यात दाखल होताच अधिकारी व कर्मचार्यांचे आनंदाने खुललेले चेहरे सर्व काही सांगून जात होते. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड (PI SAMBHAJIRAO GAIKWAD ) यांनी नव्या गाडीची पुजा केली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक थोरात,नगरसेवक शामीर सय्यद, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, लक्ष्मण ढेपे, शरद हजारे सह पोलिस कर्मचारी बांधव उपस्थित होते. (Due to the decision of the Guardian Minister, Jamkhed police became fast)