- Advertisement -

अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांनी केली कुसडगावची पाहणी ! (Upper Director General of Police Archana Tyagi inspected Kusadgaon)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मागील काही महिन्यांपूर्वी राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचा (SRP TRAINING CENTER KUSADGAON) मुद्दा भलताच गाजला होता. आता जामखेड तालुक्यातील कुसडगावमध्ये प्रशिक्षण केंद्र होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सदरची जागा राज्य राखीव पोलिस दलाकडे वर्ग झाली आहे. बुधवारी राज्य राखीव दलाच्या अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी (Archana Tyagi) यांनी कुसडगावला भेट देत नियोजीत जागेची पाहणी केली. प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा अराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. (Upper Director General of Police Archana Tyagi inspected Kusadgaon)

जामखेड तालुक्याच्या शिरपेचात  कुसडगावमध्ये होणारे प्रशिक्षण केंद्र महत्वाचे असणार आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांच्यासमवेत पोलिस उपमहानिरिक्षक संजय बावीस्कर, समादेश श्रीकांत पाठक, तहसिलदार विशाल नाईकवाडे,  पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,चंद्रकांत मकर, सचिन अडाले, पोलिस उपनिरीक्षक सुनिल ढोंबरे सह आदी अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (Upper Director General of Police Archana Tyagi inspected Kusadgaon)