लसणाने घात केला अन मोठा फांडाफोड झाला ! (Garlic infested and there was a big crack)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : नगदी पिक म्हणून खसखसीच्या पिकाची ख्याती आहे. मसाल्यात खसखशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हीच खसखस मात्र महाराष्ट्रात अनेकांना जेलवारी घडवत आहे. महाराष्ट्रात खसखस लागवडीवर बंदी आहे. अफू म्हणजे खसखसीच्या पिकाला येणारे बोंड. या बोंडातून निघणारा द्रवपदार्थाला अफू म्हणतात. अंमलीपदार्थ म्हणून याचा नशेसाठी वापर होतो. त्यामुळेच महाराष्ट्रात खसखस लागवडीवर बंदी आहे. परंतु असे असतानाही खसखस लागवडीचा मोह अनेकांना होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. असाच प्रकार जामखेड तालुक्यातील जातेगावमधून समोर आला आहे. (Garlic infested and there was a big crack)

जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील शेतकऱ्याला खसखसीची लागवड आता भलतीच महागात पडली आहे. वसुदेव काळे या शेतकऱ्याने लसणाच्या शेतात खसखस पेरली होती. काही महिन्यांत खसखसीच्या झाडाला बोंडे लगडली. खसखसीचा घमघमाट सुटला. लसणाचा अन खसखसीच्या घमघमाटाची स्पर्धा लागली. त्यात खसखस जिंकली. खसखसीने मग काळेंचे नशिब फळफळवण्याआधीच हितशत्रूंनी काळेंच्या नशीबावर दुष्मनीचा वरवंटा फिरवला अन थेट खसखसीच्या सुगंधाची खबर पोहचली पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या कोर्टात. (Garlic infested and there was a big crack)

अडीच ते तीन महिन्यांपूर्वी जामखेडचे पोलिस निरीक्षक म्हणून दाखल झालेल्या संभाजीराव गायकवाड यांनी अल्पावधीतच धडाकेबाज कारवाया करत अनेकांची पाचावर धारण तर भसवलीच शिवाय शिस्तीबध्दपणाचा पाठही अनेकांना शिकवला. यामुळे अल्पावधीत पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यातच गुरूवारी जातेगावच्या अफू शेतीची वर्दी मिळताच पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी अत्यंत गुप्तपध्दतीने विश्वासू सहकार्यांच्या माध्यमांतुन संबंधीत बातमीची खातरजमा करत जातेगावमधील अफूची शेती उध्दवस्त करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली.या कारवाईमुळे जनतेत पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या धडाकेबाज कामगिरीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या कारवाईमुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

खसखशीचा सुगंध इतरांना समजू नये यासाठी लसणाच्या पिकाची केलेली निवड ही जातेगाव प्रकरणातील सर्वात महत्वपूर्ण बाब आहे. लसणाच्या सुगंधामुळे खसखशीचा सुगंध विरून जाईल ही अटकळ पुरती फसली गेली. खसखशीने लसणाच्या सुगंधावर मात करत आपली ओळख कायम ठेवली. त्यातूनच मग जातेगाव प्रकरण चव्हाट्यावर आले.

जामखेड तालुक्यात अफूची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या वसुदेव महादेव काळे शेतकऱ्याला जामखेड न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.