Dr Kailash Rathi Nashik : आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी, डाॅ कैलास राठी प्राणघातक हल्ला प्रकरण नाशिक

Dr Kailash Rathi Nashik : नाशिकमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डाॅ कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र मोरे असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Dr Kailash Rathi Nashik news)

Dr Kailash Rathi Nashik, Accused Rajendra More remanded to police custody for seven days, Dr. Kailash Rathi assault case Nashik

नाशिक बाजार समितीच्या आवारातील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डाॅ कैलास राठी यांच्यावर त्यांच्याच हाॅस्पीटलमध्ये काम करणाऱ्या माजी महिला कर्मचाऱ्याच्या पतीने 23 रोजी सायंकाळी प्राणघातक हल्ला केला होता. हा हल्ला इतका भीषण आणि मन विचलित करणारा होता की, हल्लेखोराने डाॅ राठी यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर तब्बल 19 वार केले. त्यानंतर तो पळून गेला. नशिब बलवत्तर म्हणून डाॅ राठी यांचा प्राण वाचला. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Dr Kailash Rathi Nashik news today)

डाॅ कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या राजेंद्र मोरे याच्या पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली. डाॅ राठी यांच्या पत्नी रीना राठी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी राजेंद्र मोरे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस करत आहेत.

आपल्या घराजवळ व सध्या पत्नी नोकरी करीत असलेल्या परिसरात तिची बदनामी करणारे पत्रक छापून वाटप केले होते, यामागे डॉ. राठी असल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याचे हल्लेखोराने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

संशयित मोरेची पत्नी सुयोग हॉस्पिटलमध्ये नोकरीला असताना तिने सुमारे पाच लाखांचा अपहार केल्याचे समोर आल्याने तिला डॉ. राठी यांनी नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिला पुन्हा डॉ. राठी यांनी हॉस्पिटलऐवजी त्यांच्या जमिनींच्या कागदपत्रांची नोंदणी व इतर खासगी कामासाठी नोकरीवर रुजू करून घेतले होते.परंतु, त्यातही अपहार केल्याने राठी यांनी तिला व तिचा पती राजेंद्र याला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेत अपहार केलेल्या रकमेची मागणी केली.

त्यावर थोडा वेळ मागत पैसे परत करणार असल्याचे मोरे याने सांगितले होते. यातूनच डॉ. राठी यांच्यावर हल्ला केल्याचे समोर येत आहे. संशयित मोरे याच्या चौकशीतून आणखीही काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.