Dr. Kailash Rathi Nashik : खाजगी डाॅक्टरवर प्राणघातक हल्ला, हल्लेखोराने डाॅक्टरवर केले 19 वार, मन विचलित करणारा घटनेचा व्हिडिओ आला समोर
Dr. Kailash Rathi Nashik : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकमधील एका डाॅक्टरवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात डाॅक्टरवर तब्बल 19 वार करण्यात आले आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मन विचलित करणारा घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.
नाशिकच्या पंचवटी येथील सुयश हॉस्पिटलमधील डाॅक्टर ही कैलास राठी (Dr. Kailash Rathi Nashik) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डॉक्टर खुर्चीवर बसले आहेत. समोर एक व्यक्ती उभी आहे. या व्यक्तीने मागे हातात कोयता धरला आहे. डॉक्टर फोनवर बोलण्यात व्यस्त आहेत. हीच संधी साधत व्यक्ती कोयता काढतो आणि डॉक्टरवर सपासप वार करत जातो.
सुरुवातीला तो मानेवर वार करतो. त्यानंतर गळ्यावर वार करतो. असं करत सपासप 19 वार तो करतो आणि नंतर तिथून निघून जातो. डॉक्टर तिथंच रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसतात. इतके वार केल्यानंतरही सुदैवाने डॉक्टर जिवंत राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Dr. Kailash Rathi Nashik)
डॉ. राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी डॉ. राठी आणि त्या व्यक्तीमध्ये यांच्यात बोलणं झालं. काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघंही चर्चा करण्यासाठी गेले. त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, त्यावेळी त्या व्यक्तीने केबिनची कडी लावून धारदार कोयता काढून डॉ. राठी यांच्या डोक्यावर तसेच मानेवर वार केले, धक्कादायक म्हणजे सदर जीवघेणा हल्ला होत असताना डॉक्टरने कुठलाही प्रतिकार केला नसल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. (Dr. Kailash Rathi Nashik)
दरम्यान, नाशिकमध्ये डाॅ राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सदर घटनेचा नाशिक पोलिस वेगाने तपास करत आहेत. डाॅ राठी यांच्यावर हल्ला करणारा तो हल्लेखोर कोण याचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. (Dr. Kailash Rathi Nashik)
डाॅक्टरवर प्राणघातक हल्ला : मन विचलित करणारा व्हिडीओ 👇