संकट बर्ड फ्ल्यूचे : मोहा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित (Crisis of bird flu: Moha area declared a restricted area)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील मोहा रेडेवाडी येथील कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. (Crisis of bird flu: Moha area declared a restricted area!)
या भागातील पोल्ट्री फार्ममधील कोबड्यांचे स्वॅबनमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया पशुवैद्यकिय विभागाने हाती घेतली आहे. तसेच तालुक्यातील सर्वच पोल्ट्री फार्ममधील कोबड्यांचे स्वॅबनमुने ताब्यात घेतले जाणार आहेत. दरम्यान जामखेड तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा (Bird flu) शिरकाव झाल्याने जनतेत घबराट पसरली आहे
जामखेड तालुक्यातील मोहा आणि 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदरच्या क्षेत्रामध्ये आजारी पशु-पक्षी आढळल्यास नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिवंत वा मृत पक्ष्यांची वाहतूक, विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी शनिवारी रात्री जारी केला आहे. (Crisis of bird flu: Moha area declared a restricted area)