जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सत्ता संघर्षाचा निकाल कधी लागणार याची महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता आता संपली आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ( राखून ठेवलेला निकाल उद्या 11 मे रोजी दिला जाणार आहे. याबाबतची माहिती देशाचे सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. (Supreme Court Constitution Bench verdict on Maharashtra power struggle tomorrow)
शिवसेनेतील शिंदे गटाने बंडखोरी करत महाविकास आघाडी भूकंप घडवून आणला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे गट युतीचे शिंदे – फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आले होते. सरकार बनत असताना अनेक घटनात्मक पेच निर्माण झाले होते. शिवसेनेतील बंडखोरीचा वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. त्यावर घटनापीठ स्थापन झाले होते.
या प्रकरणात घटनापीठापुढे जलद गतीने सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल कधी लागणार ही प्रतिक्षा आता संपली आहे. उद्या 11 मे रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून हा निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निकाल काय असणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.