जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात सध्या प्रवासी बसेस पेटण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अश्या घटनांमधून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक येथील घटना ताजी असतानाच, आज भीमाशंकर येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 29 महिला प्रवासी घेऊन निघालेल्या खाजगी बसला अचानक आग लागली आहे.
नाशिकमधील बसला आग लागून बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू होण्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. आज पुन्हा प्रवाशी बस पेटण्याची घटना घडली आहे. कल्याणहून भीमाशंकरला निघालेल्या प्रवासी बसला अचानक आग लागण्याची घटना घडली आहे.
मंचर – भीमाशंकर रोडवरील घोडेगावजवळच्या शिंदेवाडी येथे सदर प्रवासी बसला अचानक आग लागली. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे, कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व 29 प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. बस पेटण्याची व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आग आटोक्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
घोडेगाव जवळील पिंपळगाव घोडेगावच्या हद्दीत भिवंडी येथून श्री क्षेत्र भीाशंकरकडे निघालेल्या महिलांच्या बसला आग लागून संपूर्ण बस खाक झाली. भिवंडी पाये गावातील 29 महिला रात्री अकरा वाजता भीमाशंकर कडे निघाल्या. सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगावच्या पुढे गाडी आली असता बाजूने जाणाऱ्या एसटी बस चालकाला ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे लक्षात आले, त्याने ही माहिती चालकाला दिली.
चालकाने गाडी बाजूला लावली असता गाडीने खालून पेट घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर चालकाने ट्रॅव्हल्स मध्ये सर्व महिला प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.काही क्षणात संपूर्ण बस जळू लागली. हळूहळू संपूर्ण बस जळून खाक झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धावा घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे महिलांना बसमधील साहित्यही काढता आले नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.