मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यांबाबत समोर आली मोठी अपडेट, 6 खात्यांमध्ये करण्यात आले फेरबदल | Maharashtra Assembly Monsoon Session 2023

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही ना काही उलथापालथ होत आहे. सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने सर्वच राजकीय गणिते बदलली आहेत. अजित पवार (DCM Ajit Pawar) गटाच्या मंत्र्यांचे खातेवाटप झाले. मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या काही नेत्यांचा संयम ढासळू लागल्याचे दिसत आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Monsoon Session 2023) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Chief Minister Eknath Shinde’s portfolios)

big update has come out regarding portfolios of Chief Minister Eknath Shinde, 6 portfolios of Chief Minister eknath shinde have been reshuffled , today big breaking news, maharashtra Assembly Monsoon Session 2023,

आज, सोमवार दि 17 जूलै 2023 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे असलेल्या काही खात्यांचा कारभार शिवसेना आमदारांकडे देण्याचा निर्णय झाला.एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती शिवसेना मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात सभागृहामध्ये उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे खातेवर्ग केलेल्या मंत्र्यांकडून दिले जातील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले सामान्य प्रशासन, नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, सामाजिक न्याय आणि दिव्यांग, परिवहन, खनिकर्म, पर्यावरण ही खाती शिवसेना मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. पावसाळी अधिवेशनात या खात्यांबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शिवसेनेचे मंत्री देतील.

कोणाला कोणते खाते देण्यात आले ?

1) गुलाबराव पाटील – सामान्य प्रशासन
2) उदय सामंत – नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान
3) शंभूराज देसाई  – सामाजिक न्याय आणि दिव्यांग
4) दादा भूसे – परिवहन
5) अब्दूल सत्तार – खनिकर्म
6) दीपक केसरकर- पर्यावरण