Wimbledon Grand Slam men’s Final Match Result 2023 : विम्बल्डनमध्ये नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करत स्पेनच्या कोर्लास अल्कराजने मारली बाजी; विम्बल्डनला मिळाला नवा स्टार !

Wimbledon Grand Slam men’s Final Match Result 2023 : विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत स्पेनचा अग्रमानांकित कोर्लास अल्कराज (Carlos Alcaraz) याने दिग्गज नोव्हाक जोकोव्हिचचा (Novak Djokovic) १-६ ,६(६)-७, ६-१, ३-६, ६-४ असा पराभव केला.

photo Credit: Official account of the championships Wimbledon

उत्कृष्ट टेनिसचे प्रदर्शन करत २० वर्षीय अल्कराजने आपणच विम्बल्डनचे नवे स्टार असल्याचे सिध्द केलं. त्याचे हे दुसरे ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी २०२२ मध्ये त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेवर आपली मोहर उमटवली होती. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंच्या खेळाने टेनिस प्रेमींची मने जिंकली. (Carlos Alcaraz win by Wimbledon Grand Slam men’s Final Match)

पहिला सेट एकतर्फी

सामन्याचा पहिला सेट एकतर्फी झाला. यामध्ये जोकोव्हिचने कार्लोस अल्कराजच्या सलग तीन सर्व्हिस ब्रेक केल्या. आणि ६-१ असा पहिला सेट आपल्या नावावर केला. (Wimbledon 2023 Final)

दुसऱ्या सेटमध्ये अल्कराजची बाजी

दुसऱ्या सेटमध्ये अल्कराजने आपली पहिली सर्व्हिस राखली. तसेच युवा अल्कराजने अनुभवी जोकोव्हिचला खेळवत त्याची सर्व्हिस ब्रेक करत दुसऱ्या सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली. दोघांनीही उत्कृष्ट बॅक हॅन्ड आणि फोर हॅन्ड प्रदर्शन घडवत सर्वांची मने जिंकली. दुसऱ्या सेटमध्ये २-० ने पिछाडीवर असताना आपला अनुभवाला उत्कृष्ट फटक्यांची जोड देत अल्कराजची सर्व्हिस ब्रेक केली आणि आपली सर्व्हिस कायम ठेवत २-२ असे बरोबरी केली.

यानंतर अल्कराज ५-४ अशा फरकाने आघाडीवर असताना जोकोव्हिचने अनुभवपणाला लावत अत्यंत चुरशीच्या दुसऱ्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी साधली. यामुळे सेट ट्रायब्रेकरमध्ये खेळवण्यात आला. यामध्ये ही दोघांनी एकमेकांना टक्कर देत शानदार खेळाचे प्रदर्शन केले. ट्रायब्रेकरमध्ये अल्कराजने ६-८ अशी बाजी मारत दुसरा सेट आपल्या नावावर करत सामन्यात बरोबरी साधली.

तिसरा सेट अल्कराजच्या नावावर

तिसऱ्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये अल्कराजने जोकोव्हिची सर्व्हिस ब्रेक करत आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमधील पाचवा गेम तब्बल २७ मिनिटे चालला. तब्बल आठ ब्रेक पॉइंटनंतर अल्कराजने निर्णायक ४-१अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचकडून नकळत चुका झाल्या आणि त्याची सामन्यावर पकड कमी होत गेली तर यामुळे अल्कराजचा आत्मविश्वास दुणावला.आपली आघाडी कायम ठेवत अल्कराजने तिसरा सेट ६-१ अशा फरकाने जिंकत दुसरा सेट आपल्या नावावर केला.

चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन

अल्कराजची सर्विस ब्रेक करत चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दमदार पुनरागमन केले. जोकोव्हिचने सर्विस ब्रेक करत ४-२ अशी आघाडी घेतली. यामध्ये त्याने बॅक हॅन्ड आणि फोर हॅन्डचे शानदार प्रदर्शन केले आणि सेट ६-३ असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली.

पाचवा सेट अल्कराजच्या नावावर बाजी

सामन्याच्या पाचव्या सेटमध्ये विम्बल्डन २०२३ च्या अंतिम स्पर्धेचा निकाल लागला. या सेटमध्ये अल्कराजने दिग्गज जोकोविचचा ६-३ ने पराभव केला.