नाशिक पदवीधर निवडणूकीत मोठा ट्विस्ट, पित्याची माघार पण पुत्र मैदानात, सत्यजित तांबे उतरणार निवडणूकीच्या मैदानात!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत काँग्रेसकडून आमदार सुधीर तांबे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असतानाच मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सुधीर तांबे यांनी निवडणूकीत माघार घेतली आहे. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे हे निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.

Big twist in Nashik graduate elections, father withdraws but son in the field, Satyajit Tambe will enter the election field,

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसने मोठी खेळी खेळली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.  तांत्रिक अडचणीमुळे मी दोन अर्ज भरले आहेत. मला अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागेल असं ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, सत्यजित तांबे यांना भाजपने उमेदवारीची ऑफर दिली होती. त्यामुळे सत्यजीत तांबे भाजपचे उमेदवार असणार अशी चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती, परंतू आता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत सगळ्यात मोठा सस्पेन्स

डॉ सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे अर्ज भरायला एकत्र गेले.तेव्हाच भाजप नेते AB form घेऊन तिथे उपस्थित होते. भाजपने कोणाला AB form दिला नाही आणि डॉ सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला!