सर्वात मोठी बातमी : शिक्षक भरती घोटाळ्यात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक, शिक्षण विभागात उडाली मोठी खळबळ !

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना पुणे पोलिसांनी अटक (arrest) करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये शैलाजा दराडे (Shailaja Darade Shikshak Bharti Ghotala) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याच गुन्ह्यात त्यांना पुण्याच्या हडपसर पोलिसांनी (Hadapsar Pune Police) अटक केली आहे.उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

शिक्षक भरती घोटाळ्याच्या (teacher recruitment scam) प्राथमिक चौकशीमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे (Shailaja Darade News) ह्या दोषी आढळून आल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपुर्वी त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता त्यांना या घोटाळ्यात अटक झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Big news, Shailaja Darade president of Maharashtra State Education Council arrested in teacher recruitment scam, excitement in education department

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यामुळे या पदाचा कारभार शैलजा दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतू शैलजा दराडे यांनी शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते. ही रक्कम पाच कोटींच्या घरात होती.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी ( Popat Suryvanshi) या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा शैलजा दराडेंवर आरोप आहे. शैलजा दराडे यांनी हे पैसै त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे (Dadasaheb Darade) याच्या मार्फत पुण्यातील हडपसर भागात घेतल्याचे तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी सांगितले.

मात्र पैसै देऊन देखील नोकरी न मिळवल्याने पोपट सुर्यवंशी (Popat Suryvanshi) यांनी पेसै परत मागीतले असता शैलजा दराडे यांनी पैसै परत केले नाहीत. त्यामुळे पोपट सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली.त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणातील तक्रारदार पोपट सुर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यात मोबाईलवरून 2019 मधे झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आल होती. ज्यामधे शैलजा दराडे या फक्त शिक्षण विभागातच नाही तर आर टी ओ मधे जर कोणाला नोकरी हवी असेल तर आपण ती लाऊन देऊ शकतो असं सांगतायत. त्यासाठी पन्नास लाख रुपये मोजावे लागतील असं त्या या ऑडिओ क्लीप मधे म्हणतायत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलीसांनी शैलजा दराडेंना अटक केलीय. (Shailaja Darade Arrest News)