Ram shinde : आमदार प्रा. राम शिंदे व आमदार मोनिकाताई राजळे यांची जिल्हास्तरीय धर्मादाय रूग्णालय समितीवर निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करून देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर (Charitable Hospital Committee) आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde MLA ) व आमदार मोनिकाताई राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. (Ram Shinde latest news)

Ram Shinde,  Selection of mla Ram Shinde on the District Level Committee of Charitable Hospital, Ahmednagar latest news,

धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पध्दतीने निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. (Ram Shinde news today)

सदर समितीवर जिल्ह्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्य, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवक, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची नियुक्ती मा. मंत्री (विधि व न्याय) यांच्या मान्यतेने करण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार आमदार प्रा राम शिंदे यांची जिल्हास्तरीय समितीवर निवड करण्यात आली आहे. (Ram Shinde news)

अहमदनगर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती कार्यरत असणार आहे. विधी व न्याय विभागाने 14 मार्च रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून आमदार प्रा राम शिंदे यांच्याबरोबर आमदार मोनिकाताई राजळे, गिरीश कुलकर्णी, डाॅ अशोक इथापे, डाॅ सुहास शंकरराव घुले यांचीही या समितीवर निवड करण्यात आली आहे. (Ram Shinde latest news)

shital collection jamkhed