शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, प्रकाश आंबेडकरांनी घेतला मोठा निर्णय, वंचितने शिवसेनेसोबतची युती तोडली, महाविकास आघाडीत नवा ट्विस्ट !

Prakash Ambedkar Shiv sena Alliance : लोकसभा निवडणुकीत एनडीए विरूध्द इंडिया आघाडी (NDA vs INDIA) असा थेट सामना रंगणार असे चित्र आहे.पण महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा ट्विस्ट पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सहभागी होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतू जागावाटपात वंचितने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. वंचित बहुजन आघाडीने युतीबाबत (Vanchit Bahujan Aghadi) मोठा निर्णय घेतला आहे.

Big blow to Shiv Sena Thackeray group, Prakash Ambedkar took big decision, Vanchit broke alliance with Shiv Sena, new twist in Mahavikas Aghadi, Sanjay Raut today live news,

महाविकास आघाडीत (इंडिया आघाडी) वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा यासाठी  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष प्रयत्नशील होते.वंचित सोबत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या अनेक चर्चा झाल्या.पण जागा वाटपाची बोलणी जवळपास फिसकटल्यात जमा आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबतची युती तोडल्याची घोषणा केली आहे.यामुळे शिवसेना (ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे.वंचितची शिवसेनेसोबतची युती निवडणूकी आधीच तुटली.प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आली असल्याची घोषणा केली आहे. परंतु, त्यांनी याबाबतची कोणतीही चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत केली नाही.त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडण्याचा घेतलेला निर्णय हा एकतर्फी आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे अवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

आज (ता. 24 मार्च) खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती तोडल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत केलेल्या युतीला दीड वर्ष होऊन गेले आहेत. ती युती अत्यंत चांगल्या हेतूने झालेली होती. त्या युतीमध्ये लोकसभेचे विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्रित काम करता येईल आणि महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याविरोधात एकत्र लढता येईल, ही त्यावेळी दोन्ही पक्षातील नेत्यांमधील भूमिका होती, असे संजय राऊतांनी सांगितले.

तसेच, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आंबेडकर भवनात जाऊन शिवसेना-वंचितच्या युतीची घोषणा केली होती. या युतीच्या घोषनेनंतर महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांमध्ये चैतन्याची लाट उसळली. ठाकरे आणि आंबेडकर यांचे फार जुने नाते आहे. ते एकत्र आले, त्याचा आनंद महाराष्ट्रातील जनतेला झाला. ही युती करताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करावे, अशी भूमिका होती. पण विधानसभा आणि महानगरपालिका या स्तरावर काम करू, असे त्यावेळी ठरले. ज्यानंतर उत्तम चर्चा आणि उत्तम संवाद या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये झाला, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

प्रकाश आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी…

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैवी आहे. याबाबत दोन नेत्यांमध्ये चर्चा होणे गरजेचे होते. जर युती करताना एकत्र चर्चा झाली तर दूर होताना एकत्र चर्चा झाली असती तर ते राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. प्रकाश आंबेडकर हे मविआचे घटक आहे. त्यामुळे लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता आणि तो कायम आहे. त्यामुळे राज्याच्या नाही तर देशाच्या हितासाठी, लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे अवाहन यावेळी राऊत यांनी केले.