KKR vs SRH Highlights: सुयश शर्माच्या कॅचने फिरवला सामना, केकेआरचा सनराईजर हैदराबादवर सनसनाटी विजय !

IPL 2024 KKR vs SRH 3rd Match Highlights Today : आयपीएलचा तिसरा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.विस्फोट बॅटिंग करणाऱ्या हेनरीक क्लासेनच्या वादळापुढे केकेआरचा पराभव होणार असे वाटत असतानाच सुयश शर्माने (Suyyash Sharma catch) सामन्याचे चित्रच बदलवून टाकले.सुयश शर्माने हेनरीक क्लासेनचा (Heinrich Klassen) अफलातून झेल पकडला आणि केकेआरचा विजय निश्चित केला.(KKR VS SRH 2024)

KKR vs SRH 2024, Suyyash Sharma's catch turns the match, KKR's sensational win over Sunrisers Hyderabad, IPL 2024 KKR vs SRH 3rd Match Highlights Today,

कौलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) 4 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. मात्र हैदराबादला त्या धावा करता आल्या नाहीत. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने 29 चेंडूत 8 सिक्ससह सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. मात्र तो टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी प्रत्येकी 32 धावा केल्या. राहुल त्रिपाठी याने 20 धावा केल्या. तर एडन मारक्रम याने 18, शाहबाज अहमद याने 16 आणि अब्दुल समद याने 15 धावांचं योगदान दिलं. तर मार्को जान्सेन 1 धावेवर नाबाद परतला. कोलकाताकडून विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हर्षित राणा याने 33 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेल याने विस्फोटक खेळीनंतर दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरेन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

केकेआरने हंगामाची सुरूवात सनसनाटी विजयाने केली. हैदराबादला विजयासाठी 209 धावांचं आव्हान मिळालं होतं. हेनरिक क्लासेन याने हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं. मात्र तो आऊट होताच सामना फिरला. हेनरिकने 63 धावा केल्या. सूयश शर्मा याने हेनरिकचा घेतलेला कॅच टर्निंग पॉइंट ठरला आणि कोलकाताने हा सामना जिंकला. कोलकाताने हैदराबादच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला आणि त्यांना पराभवाची धुळ चारली.

हैदराबादला विजयासाठी 20 व्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. शाहबाज अहमद आणि हेनरिक क्लासेन ही सेट जोडी मैदानात होती. हर्षित राणा अखेरची ओव्हर टाकायला आला. क्लासेनने पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव घेत शाहबाजला स्ट्राईक दिली. शाहबाज तिसऱ्या बॉलवर आऊट झाला.

चौथ्या बॉलवर मैदानात आलेल्या मार्को जान्सेन याने सिंगल काढून क्लासेन याला स्ट्राईक दिली. त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 5 धावांची गरज होती. क्लासेनने पाचव्या बॉलवर फटका मारला. मात्र सुयश शर्मा याने उलट धावत कॅच घेतली आणि इथेच सामना फिरला. क्लासेन आऊट झाल्यानंतर हैदराबादला 1 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. कॅप्टन पॅट कमिन्स मैदानात आला. मात्र हर्षितने हुशारीने डॉट बॉल टाकला आणि केकेआरला 4 धावांनी विजय मिळवून दिला.

सुयश शर्मा याची गेमचेंजिग कॅच

केकेआरची बॅटिंग

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक 64 धावांची नाबाद खेळी केली. तर फिलिप सॉल्ट यानेही 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. रमनदीप सिंह याने 35 आणि रिंकू सिंह याने 23 धावांचं योगदान दिलं. मिचेल स्टार्क 6 रन्सवर नॉट आऊट राहिला. वेंकटेश अय्यर 7 धावा करुन माघारी परतला. तर सुनील नरेन याने 2 रन्स केल्या. तर कॅप्टन श्रेयस अय्यर झिरोवर आऊट झाला. हैदराबादकडून टी नटराजन याने 3 विकेट्स घेतल्या. मयंक मारकंडे याने 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स याच्या खात्यात 1 विकेट गेली.

केकेआरने पहिला विजय मिळवल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, “माझ्या पोटात भीतीचा गोळा होता. शेवटच्या ओव्हरमध्ये काहीही होऊ शकतं असं वाटलं. हैदराबादला विजयासाठी 13 धावा पाहिजे होत्या. आमच्याकडे अनुभवी बॉलर नव्हता. पण माझा हर्षितवर विश्वास होता. काहीही झालं तरी काही फरक पडत नाही, असं मी त्याला म्हटलं.” असं श्रेयस विजयानंतर हर्षितला काय म्हणाला हे त्याने सांगितलं. हर्षितने हेनरिक क्लासेन या सेट फलंदाजाला 20 व्या ओव्हरमध्ये आऊट करत सामना पूर्णपणे केकेआरच्या बाजूने झुकवला. त्यामुळेस हर्षितचं कौतुक होत आहे. हर्षितने केकेआरसाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

“तुम्ही विजयाने सुरुवात करता तेव्हा नेहमीच प्रेरणा मिळते. क्रिकेटमधून खूप काही शिकायला मिळतं. या मैदानातून खूप काही शिकू शकतो”, अशी प्रतिक्रिया केकेआरचा कर्णधार श्रेयश अय्यर याने दिली.