राज्यातील 7 कोटी नागरिकांसाठी शिंदे – फडणवीस सरकारची मोठी घोषणा, दिवाळीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । दसरा मेळाव्याआधी ठाकरे विरूद्ध शिंदे हा वाद शिगेला पोहचलेला असतानाच आज शिंदे सरकारकडून दिवाळीपुर्वी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना (Ration card holders) शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील 7 कोटी नागरिकांना लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याची मोठी घोषणा केली आहे. हे अवघ्या100 रुपयात देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिवाळी पॅकेज संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिका धारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असणार आहे असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या योजनेचा राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.
दिवाळी पॅकेज संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास सरकारकडून मान्यता देण्यात आली. सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिल्या.