ओळखीच्या मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात पण जामखेड पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई, नेमकं काय घडलं वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सध्या कोणावर विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती अनेक प्रसंगातून सातत्याने अधोरेखित होत आहे, अशीच एक घटना जामखेडमधून समोर आली आली आहे. ओळखीच्या मित्राला मोबाईलच्या पिशवीवर लक्ष ठेवणे सांगणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. ओळखीच्या मित्रानेच मित्राचा विश्वासघात केला खरा पण जामखेड पोलिसांनी वेगाने सुत्र हलवत दोघांच्या मुसक्या आवळत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली.
त्याचं झालं असं की, जामखेड शहरातील अतुल बंडू जगताप हे दिनांक 01 सप्टेंबर 2022 रोजी रात्री नऊच्या सुमारास आपले दुकान बंद करुन घरी निघाले होते. परंतू मोटाकसायकलची चावी दुकानात विसरली म्हणुन ते परत आपल्या दुकानात जाण्यासाठी निघाले. जाताना त्यांनी आपल्या मोटारसायकलला एक पिशवी अडकवली आणि शेजारीच उभे असलेल्या ओळखीच्या मित्रांना पिशवीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. आणि ते दुकानात गेले.
दुकानातून चावी घेवुन दुकानासमोर असलेल्या ठिकाणी परत आले असता जगताप यांच्या ओळखीचे मित्र तिथून गायब झाल्याचे जगताप यांच्या लक्षात आले. गाडीला पिशवी पाहिली असता पिशवीही गायब झाली होती. जगताप यांच्या मित्रांनी जगताप यांच्यासोबत विश्वासघात केला होता. लोनवर खरेदी केलेले 4 मोबाईल हँन्डसेट असलेली पिशवी त्या मित्रांनी पळवून नेली होती.
त्यानुसार अतुल बंडू जगताप यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला कलम 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सदर गुन्ह्याचा तातडीने तपास करण्यासाठी गुन्हा शोध पथकाचे पथक रवाना केले होते.
पोलीस निरीक्षक जामखेड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे पोलिस नाईक संग्राम जाधव पोलिस काँस्टेबल अरूण पवार, संदिप राऊत यांच्या पथकाने महादेव उर्फ माणिक हरीदास फुंदे रा. कांदेवाडी ता.धारुर जि.बीङ व योगी बाळासाहेब जाधव रा. बुंदेलपुरा ता. जि. बीड या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई पार पाडली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
यावेळी जामखेड पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात गेलेले दोन विवो कंपनीचे X80 मोबाईल व एक आयफोन कंपनीचा महागडा मोबाईल हँडसेट असा एकुण 1लाख 62 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईचे जनतेतून कौतूक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव जामखेड पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल संंजय लोखंडे, पोलिस काँस्टेबल राठोड तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक संग्राम जाधव, पोलिस काँस्टेबल अरूण पवार, पोलीस कॉन्स्टेबल संदिप राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संदिप आजबे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक संग्राम जाधव हे करीत आहेत.