जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी बीडमधून समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकाऱ्याला तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड असे या अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

विशेष म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार जिल्हा दौऱ्यावर असतानाच ही लाचखोरी उघडकीस आली. पालकमंत्र्यांची बैठक आटोपून लखमावाड घरी गेल्यानंतर, घरातच लाचेची रक्कम स्वीकारताना तो जाळ्यात अडकला.
सरकारकडून २०२५-२६ या वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्ष लागवडीसाठी एकूण ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. हा निधी वितरीत करण्यासाठी आणि आपल्याच विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची (RFO) प्रलंबित वेतनवाढ देण्यासाठी लखमवाड यांनी १२ टक्के कमिशनची मागणी केली होती. ही रक्कम तब्बल ४५ लाख रुपये इतकी होत होती. विशेष म्हणजे, लखमवाड यांचा स्वतःचा दरमहा पगार सुमारे दीड लाख रुपये असताना त्याने केवळ एका फाईलवर सही करण्यासाठी आपल्या पगाराच्या ३० पट इतकी प्रचंड लाच मागितली होती.
सुरुवातीला संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिला होता. मात्र, लखमवाड यांनी सूडबुद्धीने त्यांची वेतनवाढ रोखली, निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील नर्सरीच्या कामाची चौकशी करण्याची धमकी दिली. अखेर वैतागून तक्रारदाराने निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने बीडमधील भाड्याच्या घरात सापळा रचला. लखमवाड याने कमिशनचे पैसे देण्यासाठी तक्रारदाराला घरी बोलावले होते. पैसे स्वीकारताना ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तोंडावरून हातरुमाल फिरवत घाम पुसण्याचा बहाणा केला. इशारा मिळताच बाहेर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने हा इशारा मिळताच घरात झाडप टाकली आणि लखमवाडला ४५ लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतले. एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेणे, या कामांसाठी लखमावाड याने 45 लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत एका तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने बीडमध्ये सापळा रचला. यावेळी 5 लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरित 40 लाखांच्या बनावट नोटा स्वीकारताना लखमावाडला रंगेहात पकडण्यात आले. कारवाईनंतर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे स्वतः बीडमध्ये दाखल झाल्या असून, स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, लखमावाड हा 2016 च्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आला होता. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचा रहिवासी असलेला लखमावाड दहावीपर्यंत नांदेडमध्ये शिकून पुढे बी.टेक इंजिनिअर बनला. निवड झाल्यानंतर त्याने स्वतःवरील विश्वास आणि कष्टाच्या जोरावर कोणतीही अडचण दूर करता येते, असे वक्तव्य केले होते.
कोण आहे श्रीनिवास लखमावाड?
श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड हे मूळचे नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवासी आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी बी.टेक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परीक्षेची तयारी करून 2016 च्या निकालात अनुसूचित जमाती प्रवर्गातून ते राज्यात प्रथम आले होते. सध्या ते सामाजिक वनीकरण विभागात विभागीय वन अधिकारी (DFO) पदावर कार्यरत आहेत. निवड झाल्यानंतर स्वतःवरील विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कोणतीही अडचण दूर करता येते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र आता त्याच अधिकाऱ्यावर लाचखोरीचा आरोप झाल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
- महत्त्वाचे मुद्दे:
- आपल्याच विभागात काम करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे लाचेची मागणी
- 45 लाख रुपयांची लाच घेताना अटक — 5 लाख रोख, 40 लाख मनोरंजन बँक नोटा
- आरोपी: श्रीनिवास लखमावाड, सामाजिक वनीकरण विभाग, बीड
- तक्रार नोंद: 29 जुलै, छत्रपती संभाजीनगर एसीबी
- सापळा कारवाई: बीड, पालकमंत्री सुनेत्रा पवार दौऱ्यावर असतानाच
- 2016 वनसेवा परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यात प्रथम
- पुढील तपास एसीबी अधिकाऱ्यांकडून सुरू