करमाळ्याच्या मंगेश चिवटेंसह सात विशेष अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येऊन महिना होत आला आहे. मंत्रिमंडळ शपथविधीला अजुनही मुहूर्त लागलेला नाही. अश्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुख्यमंत्री कार्यालयात सात विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे सर्व अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी अधिकारी असणार आहेत

मुख्यमंत्री कार्यालयात बालाजी खातगावकर खासगी सचिव, नितीन दळवी, डॉ. राजेश कवळे, डॉ. राहुल गेठे यांची विशेष कार्य अधिकारी तर प्रभाकर काळे स्वीय सहायक, प्रदीप जेठवा कक्ष अधिकारी आणि मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

करमाळ्याचे मंगेश चिवटे सांभाळणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या मंगेश चिवटे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली. या कक्षात चिवटे हे विशेष कार्य अधिकारी म्हणुन कार्यरत असणार आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख म्हणून त्यांनी यापुर्वी जबाबदारी सांभाळली आहे. या माध्यमांतून त्यांनी कोविड काळात लाखो रुग्णांना मदत मिळवून दिली होती. आता चिवटे यांना सरकारच्या माध्यमांतून मोठी कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

करमाळा येथील रहिवासी असलेल्या मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणुन नियुक्ती झाल्याने करमाळा तालुक्यासह राज्यभरातील मित्र परिवारात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंगेश चिवटे सोमवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे.या माध्यमातून रुग्णांची सेवा केली जाणार आहे.

निवडलेले अधिकारी अन् जबाबदारी

1) मंगेश चिवटे – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे.

2) बालाजी खातगावकर– आत्तापर्यंत ठाणे उपायुक्त, भिवंडी उल्हासनगर, मिरा भाईंदर येथे आयुक्त म्हणून काम केलं आहे. 2019 पासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत.

3) नितीन दळवी – सुरुवातीपासुन एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विधान मंडळातील कामकाज पाहतात.

4) राजेश कवळे– नाशिक विभागात विविध पदांवर कार्यरत होते. 2014 पासुन एकनाथ शिंदे यांच्याकडे काम करत आहेत. सर्व आमदारांच्या अडचणी समजून घेणे आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवणे हे त्याचं काम होतं

5) राहुल गेठे– उपायुक्त म्हणुन नवी मुंबई पालिकेत कार्यरत होतें. एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्याकडे गडचिरोली आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली होती. कोरोना काळात एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारासाठी मदतीचे काम त्यांनी केलं. यामधे कोव्हिड सेंटर मंजूर करणे आणि मदत पोहचवणे याचं काम पाहिलं.

6) प्रभाकर काळे– हे सुरुवातीपासुन एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणुन काम करतात.

7) प्रदीप जेठवा : कक्ष अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

Appointment of seven special officers including Mangesh Chiweten of Karmala in Chief Minister's Office, Chief Minister Eknath Shinde's big decision