श्रमिकांच्या त्याग, तपस्या आणि त्यागातून राष्ट्र निर्माण होते, भारतीय मजदूर संघ स्थापना दिन जामखेडमध्ये उत्साहात साजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा – कामगारांच्या हितासाठी मजदूर संघ झटत असतो असे नव्हे तर उद्योगहित व राष्ट्रहिताला ही प्राधान्य देणारे हे संघटन आहे. त्याग, तपस्या आणि बलिदान हा आपला नारा आहे. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ही उद्योग हिताबरोबरच लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावेत असे अवाहन भारतीय मजदूर संघाचे आदीनाथ पठाडे यांनी केले.

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ जामखेडच्या वतीेन भारतीय मजदूर संघ स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विश्वकर्माच्या प्रतिमेचे पुजन महावितरण उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल व सहाय्यक अभियंता विजय गावित यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय मजदूर संघ अहमदनगरचे सहसचिव अविनाश ओतारी यांनी भारतीय मजदूर संघ स्थापना, उद्देश व कार्य या बाबतीत विस्ताराने उल्लेख केला.

यावेेळी विभागीय अध्यक्ष भरत नाईकनवरे,गणेश सातपुते, श्रीकांत गडदे, सदाशिव थोरात, शंकर डाडर, बाबासाहेब पुराणे, फाळके, संतोष अष्टेकर विजय कापसे, चंद्रशेखर वैद्य सह आदी उपस्थित होते.