Amol kolhe News : राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा, समोर आले मोठे कारण

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 03 जूलै 2023 : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या शपविधी सोहळ्यात उपस्थित राहणारे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी 24 तासांत आपली भूमिका बदलत शरद पवारांसोबत राहणार असल्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला होता. आता डाॅ अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

Amol Kolhe News, NCP MP Dr Amol Kolhe will resign from MP, the big reason has come to light, ncp crisis latest update today,

राष्ट्रवादीत उभी फुट झाल्याने राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सोमवारी दिवसभर घडलेल्या घडामोडीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी करत सुनिल तटकरे यांची अजित पवार गटाने नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपालीताई चाकणकर तर युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांच्या हकालपट्टीची घोषणा केली आहे. तर सोनिया दुहन (Sonia Doohan) या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी दिल्ली मध्यवर्ती कार्यालयाचा कार्यभार सांभाळतील, असे शरद पवारांनी घोषित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकी बाबत एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की, राजकारणाची विश्वासर्हता, जबाबदारीची नैतिक मूल्य या सगळ्यांच्या विषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच आपला आतील आवाज म्हणतोय साहेबांसोबतच राहावं , म्हणून मी साहेबांसोबतच राहणार असे अमोल कोल्हेनी स्पष्ट केले आहे.

तर शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. डॉ अमोल कोल्हे यांनी दिली.

अमोल कोल्हे यांनी लोकमतशी बोलताना प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी नैतिक मुल्याच्या बरोबरच राहणं मला योग्य वाटते, सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार साहेबांकडे सादर करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधिला उपस्थित असल्याने ते अजित पवार सोबतच असल्याची चर्चा रविवारी ( दि.२ ) दिवसभर रंगली होती. कोल्हे म्हणाले की, मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच माझा आवाज सांगतोय की, मी शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतच राहावं , म्हणून मी त्यांच्या सोबतच राहणार आहे.

अजित पवार यांच्या शपथविधी प्रसंगी उपस्थिती बाबत खुलासा करताना कोल्हे म्हणाले की, आपण वेगळ्या कारणासाठी अजितदादांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी आपणास कोणतीही कल्पना नव्हती की आज शपथविधी आहे. तेथे गेल्यानंतर शपथविधी असल्याची माहिती समजली. त्याचवेळी आपण कार्यालयाला राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मतदारांचा विश्वास तोडून यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं आहे ते एका विचारधारेवर, विश्वास ठेवून केलं आहे.

मंगळवारी राजीनामा सादर करणार

गेली चार वर्ष शिरूर मतदार संघातील प्रश्नांची मांडणी करत असताना केंद्राच्या पॉलिसीवर, विचारधारेवर टीका करीत असताना, आपण विरोधी भूमिका घेतली आणि अचानक हे आपण कसे बदलू शकतो, हा प्रश्न माझ्या मनात, माझ्या समोर होता. म्हणून मी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पवार साहेबांची मुंबई येथे मंगळवारी भेट होणार असून तेथे आपण आपला राजीनामा सादर करणार आहोत.