Breaking News : मोहरी खून प्रकरणातील आरोपी खर्डा पोलिसांच्या ताब्यात, रस्त्याच्या वादातून मोहरीत घडली रक्तरंजित घटना, सोमवारी सकाळी मोहरीत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 3 जूलै 2023 : Mohari Murder Case : शेतातुन गुरे घेवून जाणाऱ्या चुलत्यावर पुतण्यानेच कुर्‍हाडीने खूनी हल्ला करत चुलत्याला संपवल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली आहे. मोहरी (Mohari murder news) शिवारात भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी माजी सरपंच आहे. खर्डा पोलिस स्टेशनला (Kharda Police Station) एकाच कुटुंबातील चौघा जणांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Jamkhed Crime News Today)

Accused in Mohri murder case Kharda police custody, bloody incident that took place on road dispute lot of excitement, what exactly happened in Mohri monday morning? Read in detail, jamkhed Crime News Today,

मोहरी गावातील हाळणावर कुटुंबाच्या भावकीत सोमवारी रस्त्याचा वाद विकोपाला गेला.या वादाचे पर्यावसान खुनाच्या घटनेत झाल्याने खर्डा परिसर हादरून गेला आहे.मोहरी खून प्रकरण घडल्याने मोहरी गावात मोठी खळबळ उडालीय. अचानक घडलेल्या घटनेने गावकरी स्तब्ध झालेत. मोहरी खून प्रकरणात खर्डा पोलिस स्टेशनला एकाच कुटुंबातील 4 जणांविरोधात खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपींमध्ये मोहरीच्या माजी सरपंचाचा समावेश आहे.

मोहरीत सोमवारी सकाळी नेमकं काय घडलं ?

मयताचा मुलगा आनंद अशोक हाळणावर वय 30 वर्षे याने खर्डा पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत सोमवारी सकाळी मोहरी गावात नेमकं काय घडलं? याची सविस्तर माहिती दिली आहे. यात फिर्यादीने म्हटले आहे की, माझे वडिल अशोक हाळणावर (वय 53) हे आमचे घरापासुन तेलंगशी फाटा येथे आमच्या शेतामध्ये दररोज जणावरे चारण्यासाठी घेवुन जात होते.आज 03/07/2023 रोजी सकाळी 11/30 वा. चे सुमारास मी व माझे वडिल अशोक धोंडीबा हाळणावर यांनी जनावरे चारण्यासाठी सोडली व वडिल अशोक हे जनावरे घेवुन तेलंगशी फाटा येथे जाण्याकरीता आमचे वस्तीवरुन निघाले असता माझा चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हाळणावर रा.मोहरी याने माझ्या वडीलांना तुम्ही शेतातुन गुरे घेवून जावू नका असे म्हणुन शिवीगाळ करून तुम्ही गुरे घेवून गेला तर जिवे मारूण टाकीन अशी धमकी दिली.

http://jamkhedtimes.com/breaking-news-53-year-old-farmer-of-mohri-village-was-killed-due-to-farm-road-dispute-murder-cases-filed-against-four-jamkhed-taluka-shaken-by-murder-incident-mohari-murder-news/

त्यावेळी माझे वडीलांनी त्यास तु मला शिवीगाळ करू नको, आपले जमीनीचे वाटप झालेले नाही. असे म्हणुन वडील अशोक हे आमचे सामाईक पडीक शेतामधून जणावरे घेवून जात असताना माझा चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हाळणावर रा. मोहरी हा त्याचे घरी जावून हातामध्ये कुन्हाड घेवुन माझे वडिलांचे दिशेने जात असताना मला दिसला. त्याचे पाठोपाठ त्याचा भाऊ दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर हा सुध्दा गेला, त्यामुळे मी त्यांचे पाठोपाठ माझे वडीलांकडे गेलो.

त्यानंतर पुन्हा युवराज बाबासाहेब हाळणावर याने माझे वडीलांना शिवीगाळ चालू केली त्याचवेळी सदर ठिकाणी नवनाथ सिताराम हाळणावर व आप्पा नवनाथ हाळनावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता. जामखेड जि. अहमदनगर हे माझे वडीलांचे जवळ आले, त्यांनी सर्वांनी वडीलांना शिवीगाळ करून त्यांचेपैकी दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर यांनी माझे वडीलांना हाताने मारहाण चालू केली व युवराज बाबासाहेब हाळणावर याने त्याचे हातातील कुऱ्हाडीने माझे वडीलांच्या मानेवर, गळ्यावर दोन तीन वार केले त्यामुळे माझे वडील जखमी होऊन खाली पडले असता पुन्हा युवराज याने त्याचे हातातील कुऱ्हाडीने वडीलांचे मानेवर वार केला, त्यावेळी मी तसेच माझे चुलते बाळासाहेब धोंडीबा हाळणावर, चुलती अनिता बाळासाहेब हाळणावर व ज्योती मनोज हळणावर असे आम्ही वडीलांजवळ भांडणे सोडविणे करीता गेलो असता वरील चौघे जण तेथून पळून निघून गेले.

त्यानंतर जखमी वडीलांना मी तसेच माझे चुलते बाळासाहेब हाळणावर असे आम्ही अमोल मच्छिंद्र हाळणावर याचे गाडीमध्ये घेवून उपचार कामी प्रथम लाड हॉस्पिटल, खर्डा येथे घेवून गेलो त्यानंतर ग्रामीण रूग्णालय, जामखेड येथे घेवून गेलो असता तेथील डॉक्टरांना वडीलांना तपासुन ते मयत झाल्याचे आम्हाला सांगीतले,

तरी आज दिनांक 03/07/2023 रोजी सकाळी 11/30 वा. चे सुमारास माझे वडिल अशोक धोंडिबा हाळणावर वय 53 वर्ष रा. मोहरी ता. जामखेड हे आमचे राहते घरून शेतामध्ये जणावरे चारण्या करीता घराजवळील पडीक शेतामधून घेऊन जात असतांना, जणावरे शेतामधून घेवून जाण्याचे कारणा वरून 1. युवराज बाबासाहेब हाळणावर, 2. दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, 3 नवनाथ सिताराम हाळणावर व 4. आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता.जामखेड जि. अहमदनगर यांनी वडीलांना शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचे पैकी दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर यांनी माझे वडीलांना हाताने मारहाण केली व युवराज बाबासाहेब हाळणावर याने त्याचे हातातील कुऱ्हाडीने माझे वडीलांचे मानेवर, गळ्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे.

म्हणुन माझी 1. युवराज बाबासाहेब हाळणावर, 2. दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, 3 नवनाथ सिताराम हाळणावर व 4. आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा.हाळणावर वस्ती, मोहरी ता.जामखेड जि. अहमदनगर यांचेविरूध्द तक्रार आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या पथकाने वेगाने तपास करत मोहरी खून प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनला मयताचा मुलगा आनंद आशोक हाळणावर वय 30 यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवराज बाबासाहेब हाळणावर,दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर,आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता.जामखेड या चौघा आरोपींविरुद्ध कलम 302, 323, 504,506,34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विवेकानंद वाखारे, सपोनी महेश जानकर, पोना संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल वैजीनाथ मिसाळ, शशी मस्के, अशोक बडे बाळु खाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.खुनाच्या घटनेमुळे मोहरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.