Ajit Pawar Breaking News : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाबाबत घेतला मोठा निर्णय, या मोठ्या नेत्याकडे सोपवली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी

मुंबई, 03 जूलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारपासून सत्तासंघर्षाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पक्षावरही दावा ठोकला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हा संघर्ष निर्माण झाला आहे. अश्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांनी पक्ष संघटनेवर आपले वर्चस्व रहावे यासाठी सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे.

Ajit pawar breaking news, Ajit Pawar has taken big decision regarding NCP state president, Sunil Tatkare has been entrusted with responsibility of NCP maharashtra president,

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याबरोबरच इतरही निवडी निश्चित करण्यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्या नावाची घोषणा स्वता: अजित पवार थोड्याच वेळात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हकालपट्टीची घोषणा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केली आहे.

http://jamkhedtimes.com/ncp-crisis-latest-updates-amol-kolhe-news-first-blow-to-ajit-pawars-group-after-rebellionncp-leader-who-attended-ajit-pawars-swearing-in-took-big-decision-jab-dil-aur-dimag-mein-jung-ho-dil-ki-suno/

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनिल तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली आहे.पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो. जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती.आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या ऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे, अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ९ आमदारांवर अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. तसेच या बंडानंतर पक्षातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट देखील पक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल या दोघांची राष्ट्रवादीतून हकालपट्टीची घोषणा ट्विटरवरून केली आहे. मी, राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याद्वारे श्री सुनील तटकरे आणि श्री प्रफुल्ल पटेल यांची नावे पक्षविरोधी कारवायांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. (Sharad pawar tweet)