Corona Review Meeting | अहमदनगर कोरोना आढावा बैठकीत झाला ‘हा’ निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नवे निर्देश !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा, १८ जानेवारी – अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. (Ahmednagar Corona Review Meeting New instructions given by District Collector Rajendra Bhosale)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडदे आदी अधिकारी अहमदनगर येथून उपस्थित होते.
तर जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
- जामखेड : चोंडी येथील अंजली संतोष कुरडुले हिने पटकावला तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक !
- frist time mla in maharashtra 2024 list : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
- Devendra fadnavis cm : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोण घेणार शपथ, महत्वाची अपडेट आली समोर
- Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत झालेले राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार
- karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Results Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह अपडेट्स
जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, जिल्ह्यातील कोवीड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे. त्यासाठी दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढविली पाहिजे.
दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या पण लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे. तेव्हा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सांगळे म्हणाले, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रूग्ण पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे. यासाठी कोवीड नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर द्यावा.