Ahmednagar Corona news | अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, आज 25 जानेवारी 2022 रोजी 2045 नवीन रुग्ण आढळले !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Ahmednagar Corona News | अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2045 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 11466 इतकी झाली आहे.आज 926 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 57 हजार 718 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.05 टक्के इतके झाले आहे. दरम्यान,

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 705 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1066 आणि अँटीजेन चाचणीत 274 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 241, अकाले 06,  जामखेड 13, कर्जत 19, नगर ग्रा. 51, नेवासा 20, पारनेर 54, पाथर्डी 63,  राहुरी 11, संगमनेर 17, शेवगांव 62, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 45, कॅन्टोनमेंट बोर्ड 71, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 06  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 523, अकोले 17, जामखेड 03, कर्जत 10, कोपरगाव 04,  नगर ग्रा. 56, नेवासा 47, पारनेर 109, पाथर्डी 25, राहाता 40, राहुरी 26, संगमनेर 11, शेवगाव 22, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 80, कॅन्टोन्मेंट बोर्ड 08, मिलिटरी हॉस्पिटल 13 आणि इतर जिल्हा 59 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 274 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 42, अकोले 01, जामखेड 10, कर्जत 02, कोपरगाव 23, नगर ग्रा. 14, नेवासा 18, पारनेर 03, पाथर्डी 46, राहाता 29, राहुरी 20, संगमनेर 15, शेवगांव 15, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 25, कॅन्टोनमेंट बोर्ड 03  आणि मिलिटरी हॉस्पिटल 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 358, अकोले 56, जामखेड 13, कर्जत 25, कोपरगाव 19, नगर ग्रा 70, नेवासा 19, पारनेर 37, पाथर्डी 21, राहाता 41, राहुरी 46, संगमनेर 07, शेवगांव 23, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 52, कॅन्टोनमेंट बोर्ड 30, मिलिटरी हॉस्पिटल 31, इतर जिल्हा 21 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:3,57,718

उपचार सुरू असलेले रूग्ण:11466

पोर्टलवरील मृत्यू नोंद:7173

एकूण रूग्ण संख्या:3,76,357