Aarogya Bharti 2023 |आरोग्य भरतीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा आरोग्य विभागात होणार 10 हजार जागांची मेगाभरती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 21 ऑक्टोबर 2022 । राज्याच्या आरोग्य विभागात 10  हजार जागांची पदभरती (Aarogya Bharti 2023) करणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज केली. या भरतीची नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात (Recruitment Advertisement) निघणार असल्याचेही महाजन यांनी जाहिर केले.

aarogya bharti 2023,Mega recruitment of 10 thousand seats in Maharashtra Health Department, Rural Development Minister Girish Mahajan's big announcement, Health Recruitment 2023,

यावेळी महाजन म्हणाले की, 2018 साली 13 हजार जागांच्या भरती झाली होती. मधल्या याकडे दुर्लक्ष झाले परंतू आता 2023 च्या पहिल्या आठवड्यात 10 हजार 127 जागांवर जागांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे.

आरोग्य भरतीची जाहिरात 1 ते 7 जानेवारी 2022 या काळात निघेल. फेब्रुवारी-मार्च दरम्यान आम्ही या परीक्षा घेणार आहोत. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्तीपत्रक देणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं.

महाजन ते पुढं म्हणाले की, 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. 25 जानेवारी ते 30 जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदावारांची यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर 25 ते 26 मार्च दरम्यान परीक्षा होतील.

दरम्यान 27 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत निकाल जाहीर करून उमेदवारांची नियुक्ती आम्ही करणार आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.