Sujay Vikhe : लोकसभा निवडणुक प्रचार नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा – पांडुरंग उबाळे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी जामखेड तालुक्यातील भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मंगळवारी जामखेड येथील विठाई मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.बैठकीस जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन भाजपचे तालुका सरचिटणीस पांडुरंग उबाळे यांनी केले आहे.

Sujay Vikhe Ram Shinde, Large numbers attend Lok Sabha election campaign planning meeting - Pandurang Ubale,  jamkhed times bjp news

भाजपचे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांना महायुतीने पुन्हा एकदा खासदारकीची उमेदवारी दिली आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपने तालुकानिहाय बैठका हाती घेतल्या आहेत.पहिली बैठक जामखेड तालुक्यात मंगळवारी पार पडणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे, उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

Sujay Vikhe Ram Shinde, Large numbers attend Lok Sabha election campaign planning meeting - Pandurang Ubale,  jamkhed times bjp news

भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा उमेदवार डाॅ सुजय विखे यांच्या निवडणुक प्रचारासाठी नियोजन बैठक जामखेडमध्ये मंगळवारी पार पडणार आहे. या बैठकीसाठी सर्व आजी-माजी पदाधिकारी जामखेड तालुका, भारतीय जनता पार्टी प्रमुख पदाधिकारी, जिल्हा व तालुका मोर्चा व सर्व आघड्याचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटी संचालक, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सोसायटी संचालक, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक नियोजन बैठकीस तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन भाजपचे जामखेड तालुका सरचिटणीस पांडुरंग उबाळे व जामखेड तालुका भाजपने केले आहे.