Bhaskar more news : शौक बुरी चीज होती है.. डाॅ भास्कर मोरेंच्या मागे लागले हरिण, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वनविभागाने दाखल केला गुन्हा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Bhaskar more news : रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांच्या गंभीर आरोपांनी आधीच संकट सापडलेल्या डाॅ भास्कर मोरेंच्या अडचणीत आता आणखीन मोठी वाढ झाली आहे. डाॅ भास्कर मोरेंच्या मागे आता हरण लागले आहे. ऐकुण दचकलात ना ? पण हे खरे आहे. डाॅ भास्कर मोरेंविरोधात वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात. (Bhaskar more jamkhed news)

Hobbies are bad thing, Bhaskar more news, Deer followed Dr. Bhaskar More, forest department filed a case under Wildlife Protection Act, Bhaskar more jamkhed news today,

रत्नदीप शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात हाती घेतलेल्या अंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. गेल्या सात दिवसांपासून डाॅ भास्कर मोरेंविरोधात जामखेडमध्ये आक्रमक अंदोलन सुरु आहे. भास्कर मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर मोरेंना अटक करा या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक आहेत. रत्नदीप शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्षेपांवर चौकशी समित्या गठीत झाल्या आहेत. एका समितीने रत्नदीपमधील सहा लॅब सील करण्याची कारवाई केली आहे. (Bhaskar more jamkhed news)

विनयभंगाचा गुन्हा आणि चौकशी समित्यांचा ससेमिरा डाॅ भास्कर मोरेंच्या पाठीशी लागलेला असतानाच रविवारी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. भास्कर मोरे यांच्या शैक्षणिक संकुलात हरण पाळले होते. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले. ते हरण रत्नदीप शैक्षणिक संकुलात जखमी अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. डाॅ भास्कर मोरे यांना हरिण पाळण्याचा शौक चांगलाच महागात पडला आहे. वनविभागाने डाॅ मोरेंविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. (Bhaskar more jamkhed news)

डाॅ भास्कर मोरे हे लक्झरी लाईफ जगत होते. यातून त्यांचे छंदही अजब असल्याचे आता समोर आले आहे. डाॅ मोरे यांनी याच छंदातून गेल्या सहा महिन्यांपासून हरिण पाळले होते. मोरे यांच्या काॅलेजमध्ये दोन हरिण असल्याचा व्हिडीओ 9 रोजी सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर 10 मार्च रोजी यातील एक हरिण रत्नदीप काॅलेज परिसरात जखमी अवस्थेत आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर जखमी हरण ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याला आणण्यात आले. रविवार सुट्टी असल्याने पशुवैद्यकीय डाॅक्टर हजर नसल्याने जखमी हरणावर उपचार करण्यास उशिर झाला. काही तासानंतर डाॅ राठोड हे दवाखान्यात आले. त्यानंतर हरणावर उपचार करण्यात आले. (Bhaskar more jamkhed news)

Hobbies are bad thing, Bhaskar more news, Deer followed Dr. Bhaskar More, forest department filed a case under Wildlife Protection Act, Bhaskar more jamkhed news today,

दरम्यान, रत्नदीप शैक्षणिक संकुलात जखमी हरिण असल्याची माहिती वनविभागाला समजताच वनविभागाच्या पथकाने रत्नदीप शैक्षणिक संकुल गाठले. तिथे अधिक तपास केला असता संकुलातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जखमी अवस्थेतील हरीण वनविभागाला आढळून आले. त्याचबरोबर घटनास्थळी हरणाच्या लेंढ्याही आढळून आल्या. त्यावरून मोरे यांनी हरिण पाळले असल्याचे स्पष्ट झाले. रत्नदीप शैक्षणिक संकुलात हरिण असल्याचे फोटो आणि व्हिडीओ वनविभागाला प्राप्त झाले होते. ते खरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वनविभागाने डाॅ भास्कर मोरे विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वनविभागाचे उपविभागीय अधिकारी मोहन शेळके यांनी दिली. (Bhaskar more jamkhed news)

दरम्यान, रत्नदीप शैक्षणिक संकुलात एक हरिण पुरले असल्याची तक्रार वनविभागाला प्राप्त झाल्यानंतर वनविभागाने रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या आवारात रात्री जेसीबीच्या सहाय्याने खोदाई हाती घेतली होती.चार पाच ठिकाणी खोदाई करण्यात आली परंतू. वनविभागाच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर आज खोदाई मोहिम थांबवण्यात आली. (Bhaskar more jamkhed news)

Hobbies are bad thing, Bhaskar more news, Deer followed Dr. Bhaskar More, forest department filed a case under Wildlife Protection Act, Bhaskar more jamkhed news today,

डाॅ भास्कर मोरे यांनी बेकायदेशीररित्या हरिण पाळल्यामुळे डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात वनविभागाने 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये ( भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा -सुधारणा 2002 ) गुन्हा दाखल केला आहे. मोरेंविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने मोरेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वन्यजीव कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या दोन ते सात वर्षाची शिक्षा आणि दंडाची कडक तरतुद आहे. मोरे यांचा पाय आता आणखीन खोलात गेला आहे. (Bhaskar more jamkhed news)

वनविभागाने केलेल्या कारवाईच्या पथकात वनपरिक्षेत्राचे अधिकारी मोहन शेळके सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनरक्षक एन यु तेलंगे, प्रविण उबाळे, एस. ए सपकाळ, कर्मचारी ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर. एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच . के. माळशिकारे सह आदींचा समावेश होता. (Bhaskar more jamkhed news)

चोवीस तासांत अटक करण्याचा शब्द पण पुढे काहीच नाही

डाॅ भास्कर मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी अंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी 24 तासांत डाॅ मोरेंना अटक करू असा शब्द दिला होता. परंतू फरार भास्कर मोरेंना अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. मोरेंना अटक करावी अशी अंदोलकांची आग्रही मागणी आहे. त्यांच्या या मागणीला समाजातूनही मोठे पाठबळ मिळत आहे. गेल्या सात दिवसांपासून विद्यार्थ्यांचे अंदोलन सुरु आहे. विद्यार्थी आणि सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक डाॅ भास्कर मोरेंविरोधात अधिक आक्रमक बनत चालले आहेत. मोरेंच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी मोरेंच्या अटकेसाठी जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे बोलले जात आहे. डाॅ मोरे पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Bhaskar more jamkhed news)

डाॅ भास्कर मोरेंचे बिंग फुटले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने रत्नदीप शैक्षणिक संकुलाची चौकशी केल्यानंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर रायगड आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काॅलेजची तपासणी केली. यात अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष म्हणजे समितीला नर्सिंग काॅलेजच आढळून आले नव्हते. चौकशी समिती काॅलेजवर पोहचणार हे समजताच काॅलेजला सुट्टी देण्यात आली होती. आपले बिंग फुटू नये यासाठी काॅलेज प्रशासनाने रडीचा डाव खेळला. काॅलेजमध्ये प्रवेश होण्याआधी समितीला दोन तास गेटवर ताटकळत बसावे लागले होते. (Bhaskar more jamkhed news)

दोन तासानंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर रायगड आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीने काॅलेजची पाहणी केली. त्यात समितीला अनेक धक्कादायक त्रुटी आढळून आल्या. या समितीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत रत्नदीप विरोधात कडक कारवाई करणार असल्याचा शब्द अंदोलकांना दिला. या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि. रायगडचे डॉ विशाल पांडे, डॉ संतोष शेळके, डॉ ब्रिजेश आय्यर, डॉ एस आर भगत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नासिकचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक संदिप कुलकर्णी, डॉ अभय पाटकर नासिक, होमिओपॅथी कॉलेज कोल्हापूरचे डॉ मिलिंद गायकवाड यांचा समावेश होता. (Bhaskar more jamkhed news)

मंगल कार्यालय बनले होस्टेल

या दोन्ही समित्यांच्या पाहणीत विद्यार्थ्यांना वस्तीगृह म्हणून चक्क मंगल कार्यालयात ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये होस्टेल फी उकळण्यात आली होती. या मंगलकार्यालय कम होस्टेलमध्ये कुठल्याच सुविधा नव्हत्या,वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संस्थेकडून अतिशय खालच्या स्तरावर पिळवणूक केली जात असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. संस्थेच्या मनमानी कारभाराचा भांडाफोड यातून झाला आहे. मंगल कार्यालयात लग्न असले की विद्यार्थ्यांचे बिऱ्हाड बाहेर काढले जायचे. गेल्या तीन महिन्यांपासून होस्टेल म्हणून मंगल कार्यालयाचा वापर सुरू होता. यात 32 विद्यार्थी राहत होते. (Bhaskar more jamkhed news)

उपोषकर्ताची प्रकृती खालावल्याने उपचार

रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरेंवर हाती घेतलेल्या अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी गेल्या चार दिवसां उपोषण हाती घेतले आहे. चार दिवसांत त्यांचे चार किलो वजन घटले आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डाॅ युवराज खराडे यांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. भोसले यांना रविवारी सलाईन लावण्यात आली होती. (Bhaskar more jamkhed news)

shital collection jamkhed