Bhaskar More News : विद्यार्थ्यांच्या आंदोलनास जामखेड तालुका मोबाईल असोसिएशनचा जाहीर पाठिंबा, संघटनेने केली मोठी मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेकडून होत असलेल्या आर्थिक, मानसीक व शारीरिक छळास कंटाळून उद्विग्न झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुरू केलेल्या अंदोलनास समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. आज आंदोलनाच्या सातव्या दिवशी जामखेड तालुका मोबाईल असोसिएशनने (Jamkhed Taluka Mobile Association) या आंदोलनास जाहीर पाठींबा देत भास्कर मोरेंच्या अटकेची मागणी केली आहे (Bhaskar more jamkhed news today)

Bhaskar More jamkhed News today, Public support of Jamkhed Taluka Mobile Association to students' protest, Ratnadeep medical college

याबाबतचे निवेदन जामखेडचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फौंडेशन या संस्थेमध्ये राज्याच्या व देशाच्या कानकोपऱ्यातून शेकडो मुल – मुलींनी प्रवेश घेतलेला आहे. संस्थेचा अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे हा मुला मुलींची वारंवार आर्थिक, मानसीक व शारिरीक पिळवणूक करत आलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विद्यार्थिनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, त्या प्रकरणात तो जामिनावर आहे. त्याच्यावर आणखीन एक असाच गुन्हा दाखल झालेला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या सर्व कॉलेजमध्ये आवश्यक शिक्षक स्टाफ, लॅब, प्रात्यक्षिक सुविधा अजिबात उपलब्ध नाही त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमानुसार कोणतेही योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळतं नसून गैर मार्गाचा वापर करून फक्त पास करून देण्याची हमी दिली जाते व त्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार केले जातात.

जे विद्यार्थी पूर्ण प्रशिक्षण व शिक्षणाचा आग्रह धरतील व त्याच्या गैर मार्गात सहभागी होण्यास नकार देतील त्यांना दम देणे, मुलींना कॅबिनमध्ये बोलावून घेऊन मानसीक व शारिरीक छळ करणे असे प्रकार खुद्द संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून केले जात असल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहेत. याची सखोल चौकशी करून भास्कर मोरे विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.

रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली अजीबात सुरक्षीत नाहीत, ही गंभीर परिस्थिती आहे. भास्कर मोरेविरोधात आणखीन एका विद्यार्थिनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. भास्कर मोरे विरोधात गंभीर गुन्हे दाखल होऊनही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भास्कर मोरे याला तातडीने अटक करावी अशी मागणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

जामखेड मोबाईल असोशिसनचे विजय आहुजा, सुनील जगताप, संतोष नवलाखा,सुनील कुलकर्णी ,वैभव टेकाळे, सागर आष्टेकर , गोविंद साठे , सुनील कांबळे , गहिनीनाथ वीर , सुमित मिसाळ, करण गुलाटी ,महादेव खैरे , अनिल गळगटे ,बाळू तांबे यांनी जामखेडचे तहसीलदार यांची आज भेट घेऊन वरील मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

shital collection jamkhed