जामखेड बाजार समिती निवडणूकीसाठी भाजपा सज्ज, चोंडीत पार पडली नियोजन बैठक, निवडणूकीत तगडे उमेदवार दिले जाणार – आमदार राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेेख। एकिकडे ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा सुरू असतानाच, आता बाजार समिती निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, या निवडणुकीत आपला तगडा पॅनल उतरवण्याच्या हालचाली भारतीय जनता पार्टीने हाती घेतल्या आहेत. त्यादृष्टीने आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची निवडणूक नियोजनासाठाची बैठक आज चोंडी येथील निवासस्थानी घेतली.

BJP is ready for Jamkhed Bazar Committee Election, planning meeting was held in Chondi, strong candidate will be given in election - MLA Ram Shinde

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अर्थात आमदार रोहित पवार गटाला पराभवाची धुळ चारण्यासाठी भारतीय जनता पार्टी अर्थात आमदार राम शिंदे गट सज्ज झाला आहे. जामखेड बाजार समिती निवडणूकीच्या नियोजनासाठी आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. यात निवडणूकीचे गणित मांडण्यात आले. बाजार समितीसाठी सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, नुुसते पद मिरवणाराला उमेदवारी नको असा सुर या बैठकीत निघाला.

Advertisement

जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत, सर्वांना विश्वासात घेऊन पुढील रणनिती ठरवण्यात येईल, ही निवडणुक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद आपल्या उमेदवारांच्या पाठीशी लावावी, या निवडणुकीत आपल्या पॅनलकडून तगडे उमेदवार दिले जाणार आहेत, उमेदवार निवडताना कोणाचाही वशिला चालणार नाही, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी बैठकीत बोलताना केले.

BJP is ready for Jamkhed Bazar Committee Election, planning meeting was held in Chondi, strong candidate will be given in election - MLA Ram Shinde

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, आप्पासाहेब ढगे, उदयसिंग पवार, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, आप्पासाहेब ढगे, प्रविण चोरडिया,डाॅ.अल्ताफ शेख,बिट्टु मोरे, डॉ.गणेश जगताप,गौतम कोल्हे, राम पवार, वैभव कार्ले, अजय सातव, राहुल चोरगे,गणेश शिंदे,बाजीराव गोपाळघरे, तुकाराम कुमटकर हर्षल बांगर, महारुद्र महारणवर,मच्छिंद्र गिते, संदीप जायभायतान्हाजी फुंदे,भरत उगले, लहू शिंदे,पांडुरंग उबाळे, बापुराव ढवळे, सोमनाथ पाचरणे, डाॅ बाळासाहेब बोराटे,सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP is ready for Jamkhed Bazar Committee Election, planning meeting was held in Chondi, strong candidate will be given in election - MLA Ram Shinde