विविध उपक्रम राबवत संघर्ष मित्र मंडळाने गाजवला यंदाचा गणेशोत्सव !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गणेशोत्सवात दरवर्षी भव्य दिव्य आकर्षक मिरवणुकीची परंपरा जपणाऱ्या जामखेड शहरातील कोर्ट रोडवरील संघर्ष मित्र मंडळाने यंदा डीजे व गुलालाला फाटा देत टाळ मृदूंगाच्या गजरात सुमारे ५० बालवारकऱ्यांसह लेझीम पथकाची मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक विसर्जन मिरवणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीने जामखेडकरांची मने जिंकली.

Sangharsh Mitra Mandal celebrated this year's Ganeshotsav by implementing various activities!

अनेक वर्षांपासून संघर्ष मित्र मंडळाची पारंपारिक पद्धतीने, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक निघते. यंदाची ही परंपरा मंडळाने जोपासली. जामखेड शहरात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. 40 वर्षांची परंपरा असलेल्या संघर्ष मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव गाजवला. मंडळाने विविध उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला. मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूकही लक्षवेधी ठरली.

Sangharsh Mitra Mandal celebrated this year's Ganeshotsav by implementing various activities!

पारंपारिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि लेझीम खेळाची प्रात्यक्षिके, टाळ मृदूंगाचा गजर अशा थाटात संघर्ष मित्र मंडळाची मिरवणूक निघाली होती. डीजे व गुलालाला फाटा देत राजुरी व पाडळी येथील वारकऱ्यांसह लहान मुलांचे लेझीम पथक मिरवणुकीसाठी आणण्यात आले होते. या मिरवणुकीत पारंपारिक पद्धतीने फेटे बांधून महिलावर्ग तसेच पारंपरिक पोशाखात पुरुष सहभागी झाले होते.

Sangharsh Mitra Mandal celebrated this year's Ganeshotsav by implementing various activities!

सायंकाळी चार वाजता सुरू झालेली मिरवणूक आठ वाजता संपली. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते गणरायाची आरती करून विसर्जन करण्यात आले. संघर्ष मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवत यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला.

Sangharsh Mitra Mandal celebrated this year's Ganeshotsav by implementing various activities!