अष्टेकर मोबाईल शाॅपी आयोजित लकी ड्रॉ स्पर्धेचे विजेते जाहीर, सागर आष्टेकर यांनी अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला – अमित चिंतामणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील आष्टेकर मोबाईल शाॅपी यांच्या वतीने दिवाळी आणि दसरा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्राॅ ची सोडत आज जामखेड शहरात काढण्यात आली. या लकी ड्राॅ साठी 1 ते 31 ऑक्टोबर काळात मोबाईल खरेदी केलेले 106 ग्राहक पात्र होते. यातील सहा विजेते जाहीर करण्यात आले आहेत.

यावेळी बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, ग्राहकांचं हित डोळ्यास समोर ठेवून सागर आष्टेकर हा तरूण व्यावसायिक गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. मोठ्या विश्वासाने अनेक ग्राहक आष्टेकर मोबाईल शाॅपीमध्ये मोबाईल खरेदी करतात, सागर आष्टेकर यांनी अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करत बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे त्यांच्या मोबाईल शाॅपीची लोकप्रियता वाढली आहे. त्यांच्या मोबाईल शाॅपीकडून आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्राॅ मधील सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख कैलास माने म्हणाले की, गरिबीचे चटके सहन करत व्यावसायिक बनलेल्या सागर आष्टेकर या तरूण उद्योजकाचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पाच बाय सात च्या जागेतील दुकानातून सागर आष्टेकर यांनी व्यवसायात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.

यावेळी उपस्थित मान्यवर आणि लहान मुलीच्या हस्ते लकी ड्राॅ ची सोडत जाहीर करण्यात आली. यात सहा विजेते जाहीर करण्यात आले. यामध्ये 1) वैशाली डोळस -वाॅशिंग मशीन 2) श्रीहरी थोरवे – विवो मोबाईल 3) अशोक शेळके – स्पोर्टस सायकल, 4) मंगेश कराड स्मार्ट वाॅच 5) क्रांती वनवे – एअर बड, 6) गणेश चावरे – एअर बड अशी सहा बक्षिसे चिठ्ठी टाकून निवडण्यात आली. ऊर्वरित 100 ग्राहकांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

यावेळी आष्टेकर मोबाईल शाॅपीचे संचालक सागर आष्टेकर, नगरसेेक अमित चिंतामणी, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख कैलास माने, वसंत सानप, सुदाम वराट, सत्तार शेख, ज्ञानेश्वर अंदुरे, प्रा संजय राऊत, युवा उद्योजक संदिप सांगळे, बजाज फायनान्सचे मॅनेजर ऋषभ चव्हाण, किशोर रोकडे, बालाजी गोखले, योगेश सोनवणे, गौरव अंदुरे, अनिकेत झिंझाडे, सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जेधे सर यांनी केले.