ब्रेकिंग न्यूज : जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप, रोहित पवारांना पुन्हा एकदा जोर का झटका, राष्ट्रवादीच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अश्यातच कर्जत-जामखेड मतदारसंघातही मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपात इनकमिंग करताना दिसत आहेत.शनिवारी असाच एक राजकीय भूकंप जामखेड तालुक्यात झाला आहे.

Political earthquake in Jamkhed taluka, Rohit Pawar got another blow, Sarpanch of nationalist Sharad Pawar group along with Gram Panchayat members joined BJP, ram shinde latest news today,

जामखेड तालुक्यातील जातेगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व इतरांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे. राष्ट्रवादीच्या सरपंचाने भाजपात प्रवेश केल्याने रोहित पवारांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे.

जामखेड तालुक्यातील जातेगावचे सरपंचपद गेल्या एक वर्षांपासून रिक्त होते. 21 मार्च 2024 रोजी सरपंचपदाची निवडणूक पार पडली होती. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आशालता रामदास गायकवाड यांची सरपंचपदी निवड झाली होती. सरपंचपदी निवड होऊन दोन दिवस उलटत नाही तोच जातेगावात मोठा राजकीय भूकंप झाला. जातेगावच्या सरपंच आशालता रामदास गायकवाड यांनी ग्रामपंचायत सदस्या प्रयागा अंगद गायकवाड, उषा छबू गायकवाड आर्केश गायकवाड व इतरांसह आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

आमदार शिंदे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास दाखवत गेल्या काही दिवसांपासून गावोगावचे सरपंच भाजपात दाखल होत आहेत. आमदार प्रा राम शिंदे हे नेहमी कार्यकर्त्यांना ताकद देणारं नेतृत्व म्हणून ओळखले जाते. याचा अनुभव गेल्या काही वर्षांपासून कार्यकर्त्यांना सातत्याने येतो आहे. परंतू  2019 नंतर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आमदाराकडून मिळालेली वागणूक कार्यकर्त्यांना नाउमेद करणारी ठरली. याच गोष्टीला वैतागून राष्ट्रवादीतील अनेकांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे. आता जातेगावमध्येही राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. जातेगावच्या सरपंचाने सदस्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

Political earthquake in Jamkhed taluka, Rohit Pawar got another blow, Sarpanch of nationalist Sharad Pawar group along with Gram Panchayat members joined BJP, ram shinde latest news today,

विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा एकदा विकासाचा नवा झंझावात निर्माण केला आहे.त्यामुळे मतदारसंघातील गावोगावचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भाजपात मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहे. ‘आपला तो आपलाच’ असतो ही भावना मतदारसंघातील जनतेसह कार्यकर्त्यांमध्ये मजबुत होऊ लागली आहे. याचा प्रत्यय भाजपात सुरु झालेल्या इनकमिंग मोहिमेमुळे अधोरेखित होत आहे.

भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांच्या पुढाकारातून जातेगावच्या सरपंच आशालता गणेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या प्रयागा अंगद गायकवाड,उषा छबु गायकवाड, आर्केश गायकवाड भाऊसाहेब गायकवाड, सुभाष गायकवाड,दत्ता गायकवाड, रेवन भोसले, अनिकेत चव्हान, विशाल काळे, संदीप गर्जे, काका चौधरी,अभय चव्हाण, कांतीलाल गायकवाड,प्रविन मेंगडंबर,बाजीराव भोसले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी भाजपा नेते रविंद्र सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सोमनाथ पाचरणे, मार्केटचे सभापती शरद कार्ले, तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, प्रशांत शिंदे, सुशिल आव्हाड, राजेंद्र ओमासे, अशोक महारनवर, प्रसिध्दी प्रमुख उध्दव हुलगुंडे,  सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

shital collection jamkhed