Hidden World Discovered Under Ice in Antarctica । अजबच.. बर्फाखाली सापडले नवे जग, NIWA संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळाले यश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Hidden World Discovered Under Ice in Antarctica । जगभरात नवनवीन संशोधन सुरू आहेत, या संशोधनातून अनेक गोष्टी समोर येत आहेत, शास्त्रज्ञांनी केलेल्या अशाच एका संशोधनाला आता मोठे यश मिळाले आहे, चक्क बर्फाखाली लपलेले नवे जग सापडल्याची घटना समोर आली आहे, ही घटना अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशातून समोर आली आहे.

अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात बर्फाखाली गाडले गेलेले नवे जग शोधण्यात न्यूझीलंडच्या संशोधकांना यश आले. बर्फाळ पृष्ठभागापासुन अवघ्या 500 मीटर खोल भागात विशाल महलासारखी गुहा शोधून काढण्यात आली आहे. या ठिकाणी जलचरांचा परिपूर्ण वावर आहे.ॲम्फीपॉडसह (Amphipods) अनेक प्रकारचे प्राणी या नवीन जगात दिसले. हे लॉबस्टर, खेकडे आणि माइट्स कुटुंबातील प्राणी आहेत. (Hidden World Discovered Under Ice in Antarctica)

न्यूझीलंडच्या संशोधकाचे एक पथक अंटार्क्टिका प्रदेशात संशोधनासाठी गेले होते. त्या ठिकाणी भूगर्भीय आणि अणूविज्ञानाचा भाग तसेच हवामान बदलामुळे वितळणार्‍या बर्फाळ भागातील नदीच्या भूमिका समजून घेण्यास या पथकाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड ॲटमॉस्फेरिक्स (निवा) National Institute of Water and Atmospherics (NIWA) या संस्थेकडून सांगण्यात आले होते.

Hidden World Discovered Under Ice in Antarctica

बर्फाच्या पृष्ठभागाखाली ड्रिलिंग करताना हे पथक नदीजवळ पोहोचले, त्यावेळी या पथकाच्या कॅमेर्‍यात लहान ॲम्फीपॉड (Amphipods) आढळून आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड ॲटमॉस्फेरिक्स (निवा) चे क्रेग स्टीव्हन्स यांनी सांगितले की, आम्हाला वाटले कॅमेरा खराब आहे परंतू जेव्हा चांगला प्रकाश होता तेव्हा पाहिले असता, आम्हाला आर्थ्रोपॉड्चा (Arthropods) थवा दिसला.

आम्ही अंटार्क्टिकाच्या अनेक भागात प्रयोग केले होते, मात्र यावेळी आम्हाला खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांना आमच्या उपकरणांभोवती तरंगताना पाहुन एक गोष्ट स्पष्ट झाली की याठिकाणी एक परिसंस्था आहे. (Hidden World Discovered Under Ice in Antarctica)

हा Video आवर्जून पहा